HSRP नंबर प्लेट नसल्यास किती दंड भरावा लागेल? रस्त्यावर अशी गाडी दिसली तर पोलीस काय कारवाई करतील?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
What is the penalty for HSRP number plate : हे केवळ एक पर्याय नाही, तर सरकारने केलेला कायदेशीर नियम आहे. जर तुमच्याकडे ही प्लेट नसेल, तर आरटीओ किंवा ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात.
महाराष्ट्रात आता सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी HSRP (High Security Registration Plate) असणं बंधनकारण केलं आहे. मग ती गाडी टुव्हिलर असोत, फोर व्हिलर किंवा थ्री व्हिलर. हे केवळ एक पर्याय नाही, तर सरकारने केलेला कायदेशीर नियम आहे. जर तुमच्याकडे ही प्लेट नसेल, तर आरटीओ किंवा ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
महाराष्ट्र आरटीओ विभागानुसार, जर तुमच्या गाडीवर HSRP नसल्याचे (What is the penalty for HSRP number plate) आढळले, तर ₹5000 ते ₹10,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. ही रक्कम त्यात्या राज्याच्या नियमांवर आधारीत आहे. भारतात केंद्र सरकारने एप्रिल 2019 पासून सर्व नव्या वाहनांसाठी HSRP बंधनकारक केली आहे. परंतु जुन्या वाहनधारकांनाही ही प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. विशेषतः दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान यासारख्या अनेक राज्यांत तीव्र मोहीम राबवून दंड आकारला जातो.
advertisement
advertisement