ज्यांनी अजूनही ही नंबर प्लेट घेतली नाही त्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही तुमच्या जुन्या वाहनावर (एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या) अजूनही HSRP नंबर प्लेट बसवली नसेल, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. वाहन चोरी आणि फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने HSRP नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. या प्लेट्सवर एक विशिष्ट लेझर-एच्ड कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि स्नॅप-लॉक सिस्टम असते, ज्यामुळे त्या बनावट करणे किंवा बदलणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढते आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे सोपे होते.
advertisement
गेल्या काही महिन्यांपासून परिवहन विभागाने HSRP प्लेट बसवण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला मार्च 2025 मध्ये असलेली मुदत अनेकदा वाढवून ती आता 15 ऑगस्ट 2025 करण्यात आली आहे. मात्र, यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तातडीने या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
16 ऑगस्ट 2025 पासून, परिवहन विभागाचे भरारी पथक आणि पोलीस दल HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू करेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी 5000 पर्यंत आणि पुन्हा पुन्हा आढळल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे, मोठ्या दंडापासून वाचण्यासाठी आणि आपल्या वाहनाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, लवकरात लवकर HSRP नंबर प्लेट बसवून घ्या. ही प्लेट बसवण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करू शकता.
सरकारने आतापर्यंत नव्या नंबरप्लेटसाठी तीनवेळा मुदतवाढ केली आहे. 30 एप्रिलपर्यंत शेवटची तारीख होती, ती वाढवून 30 जून करण्यात आली, त्यालाही मुदतवाढ देऊन 15 ऑगस्ट करण्यात आली आहे. यानंतर मुदतवाढ केली जाईल याचे कोणतेही संकेत सरकारने दिले नाहीत. त्यामुळे मुदतवाढ होईल या भरवशावर राहिला असाल तर फसगत होऊ शकते. आताच अर्ज करून नवीन नंबर प्लेट घेऊन टाका.
