सोलापूर - सोलापुरच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान–पौष्टिक तृणधान्य सन 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामात ज्वारी पिकाचे मिनिकिट या बाबीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी चालू वर्षी ज्वारी पिकाचे मिनिकिट हे 4 किलो प्रति मिनिकिट पॅकिंग साईजमध्ये प्राप्त झाले आहे.
तालुका स्तरावर उपलब्ध होणार बियाणे -
advertisement
ज्वारी मिनिकिटसाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाणांचे 4 किलोप्रमाणे एक मिनिकिट लाभ मिळणार आहे. सोलापुर जिल्ह्यासाठी 85 हजार 880 मिनिकिट लक्षांक असुन त्यासाठी 3435.20 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधुन बियाणे उपलब्ध करून घ्यावे. हे बियाणे तालुकास्तरावर उपलब्ध होणार आहे.
सांगलीकरांसाठी महत्त्वाची बातमी!, 2 दिवाळी विशेष गाड्यांना मिळाला थांबा, असं असेल संपूर्ण नियोजन
यामध्ये फुले सुचित्रा आणि परभणी सुपर मोती या वाणांचा समावेश आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रमाणीत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.