समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांच्या सोयीसाठी कोल्हापूर-मुंबईदरम्यान दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सकाळी लवकर मुंबईला जाऊन काम आटोपून रात्री परत येणे शक्य होणार आहे. येत्या 11 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे.
Weather Alert: काळजी घ्या! पुणे ते कोल्हापूर हायअलर्ट, या भागात अतिमुसळधार, आजचा हवामान अंदाज
advertisement
कोल्हापूर-मुंबई हवाईमार्ग हा 'उडान' योजनेत मोडतो. त्यामुळे सध्या सेवा देणारी विमान कंपनी दुसऱ्या विमान कंपन्यांना 'एनओसी' देत नव्हती. मात्र, सप्टेंबर महिन्यात या योजनेची मुदत संपणार आहे. त्यामुळे इतर विमान कंपन्यांसाठी हा मार्ग खुला झाला आहे. इंडिगोने कोल्हापूर-मुंबईसाठी मागणी केलेल्या मार्गाला मंजुरी मिळाली असून 11 नोव्हेंबरपासून सकाळी आणि रात्री अशा दोन फ्लाईट सुरू होणार आहेत.
कोल्हापूर-मुंबई फ्लाईटचं संभाव्य वेळापत्रक
मुंबई-कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोल्हापूरला येणारी फ्लाईट पहाटे 6 वाजून 5 मिनिटांनी टेकऑफ करेल आणि सकाळी 7 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
कोल्हापूर-मुंबई: छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून मुंबईला येणारी फ्लाईट सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी टेकऑफ करेल आणि सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.
मुंबई-कोल्हापूर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही फ्लाईट रात्री 7 वाजून 10 मिनिटांनी निघेल आणि रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल.
कोल्हापूर-मुंबई: छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून ही फ्लाईट रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी निघेल आणि रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी मुंबईला पोहोचेल.
सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा लवकरच
सोलापूर शहर आता थेट देशाच्या प्रमुख आर्थिक केंद्रांशी थेट जोडलं जाणार आहे. सोलापूर-पुणे-मुंबई विमान सेवेसाठी केंद्र सरकारने 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. ही विमानसेवा उडान योजनेअंतर्गत सुरू होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या वर्षी तिकिटांवर 100 टक्के आर्थिक मदत दिली जाईल. सुमारे 3,240 रुपयांपर्यंत तिकिट उपलब्ध असण्याची शक्यता आहे.