महाराष्ट्रात पाऊस आणखी धुमाकूळ घालणार, 29 जिल्ह्यांना अलर्ट
सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 455 रिक्त पदांची भरती सुरु आहे. 455 पदांसाठी सुरक्षा सहाय्यक या पदासाठी भरती होणार आहे. या पदासाठी 10 वी पास, LMV (लाईट मोटर व्हेईकल) Driving License आणि लायसन्स मिळाल्यानंतर किमान 1 वर्षाचा ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव अशी पात्रता आहे. सुरक्षा सहाय्यक पदासाठी नमूद केलेल्या 455 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी गुप्तचर विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचनाही वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
advertisement
मुसळधार पावसाने सोयाबीन- कपाशीला आले कोंब, शेकडो शेतकरी चिंताग्रस्त
वयोमर्यादा 18 ते 27 वर्षांपर्यंतची देण्यात आली आहे. अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. सुरक्षा सहाय्यक हे पद तिसऱ्या पातळीवर येते. या पदासाठी उमेदवारांना 21700 ते 69100 रूपयांपर्यंत वेतन असणार आहे. डेबिट/ क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI किंवा चलनाच्या माध्यमातून अर्जदारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्क भरण्याचे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी, इतर मागासवर्गीयांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वर्गातील पुरूषांसाठी 650 रूपये इतके अर्ज शुल्क असणार आहे. तर, अनुसूचित जाती- जमाती, महिला आणि माजी सैनिक यांना 550 रूपये इतके अर्ज शुल्क असणार आहे. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी जाहिरात PDF पाहावी.