TRENDING:

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा 'मोठा मासा' भाजपच्या गळाला? गुप्त भेटीनंतर चर्चांना उधाण

Last Updated:

शिवसेनेच्या 56 पैकी 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, यानंतर आता आणखी एक आमदार ठाकरेंना धक्का देणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भरत केसरकर, प्रतिनिधी
उद्धव ठाकरेंचा 'मोठा मासा' भाजपच्या गळाला? गुप्त भेटीनंतर चर्चांना उधाण
उद्धव ठाकरेंचा 'मोठा मासा' भाजपच्या गळाला? गुप्त भेटीनंतर चर्चांना उधाण
advertisement

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या 56 पैकी 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, यानंतर आता आणखी एक आमदार ठाकरेंना धक्का देणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत, याला कारण आहे ठाकरेंसोबत असलेल्या आमदाराने भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची गुप्त भेट घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गुप्त भेटीनं कोकणातील राजकीय वातावरण तापलंय. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.

advertisement

नाईक आणि चव्हाण यांच्या भेटीमुळे चर्चांना प्रचंड उधाण आलंय. लोकसभा निवडणुका जवळ आल्यानं पक्षांतराला सुरूवात झालीय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेससोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय. आता या पंक्तीत वैभव नाईकही बसणार अशी चर्चा सुरू झालीय. वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीमुळे या चर्चेला तोंड फुटलंय. वैभव नाईक आणि त्यांचं कुटुंब मूळचं काँग्रेसी विचारांचं आहे, याकडे निलेश राणेंनी लक्ष वेधलं. तसंच आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही, असा टोलाही निलेश राणेंनी लगावला.

advertisement

जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची नाराजी; आता तोडगा कसा निघणार?

खासदार विनायक राऊत यांनी पक्षांतराच्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचा दावा केलाय. तर हे बदनामीचं षडयंत्र असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय. चौकशीतूनही गैरमार्गानं पैसा कमावल्याचा आरोप सिद्ध करता आला नाही. त्यामुळे अफवा पसरवल्या जात असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं.

advertisement

कुडाळ मालवण मतदारसंघ भाजपच्या वाटेला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. या मतदारसंघातून निलेश राणेंनी जोरदार कंबर कसली आहे. त्यामुळे निलेश राणेंना शह देण्यासाठी वैभव नाईक भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यातच एसीबी चौकशीतून सुटका करून घेण्यासाठीही वैभव नाईक कोणता पर्याय निवडतात, याविषयी आता औत्सुक्य निर्माण झालंय.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा 'मोठा मासा' भाजपच्या गळाला? गुप्त भेटीनंतर चर्चांना उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल