TRENDING:

ISRO- सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विविध पदांवर नोकर भरती, अर्जाचे सर्व Detail बातमीमध्ये

Last Updated:

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये अनेक तरूणांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. श्रीहरीकोट्यामध्ये इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC) मध्ये नोकरभरती केली जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (Indian Space Research Organization) अनेक तरूणांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने अलीकडेच नोकर भरतीची घोषणा केली आहे. श्रीहरीकोट्यामध्ये इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC) मध्ये नोकरभरती केली जाणार आहे. शास्त्रज्ञ, अभियंता, तांत्रिक सहाय्यकासह इतर सहाय्यक कर्मचार्‍यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या 21 प्रकारच्या पदांवर 141 जागांसाठी ही नोकरभरती केली जाणार आहे, संपूर्ण नोकरभरतीबद्दल जाणून घेऊया...
News18
News18
advertisement

इस्रो संस्था ज्या ठिकाणाहून अंतराळामध्ये यान सोडतं, आता त्या ठिकाणी देशातल्या तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. श्रीहरीकोट्यामधील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये नोकरीची संधी आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या अर्जप्रक्रियेचा अखेरचा दिवस 14 नोव्हेंबर आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ/ अभियंता 'SC', तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक 'A', ड्राफ्ट्समन 'B', तंत्रज्ञ 'B', रेडिओग्राफर-A, नर्स 'B', कुक, फायरमन 'A', आणि हलके वाहन चालक 'A' यांसारख्या वेगवेगळ्या पदांवर भरती केली जाणार आहे.

advertisement

शास्त्रज्ञ/ अभियंता 'SC' पदासाठी एमई/ एम.टेक/ एम.एस्सी (इंजिनिअरिंग) किंवा बीई/बी.टेक/बी.एस्सी (इंजिनिअरिंग) पदवी आवश्यक आहे. उदाहरणार्थ- 'मशीन डिझाइन' शाखेमध्ये किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किमान 65% गुणांसह पदवी आवश्यक आहे. इतर तांत्रिक आणि सहाय्यक पदांमध्ये केमिकल इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, ऑटोमोबाईल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, सिव्हिल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग आणि रसायनशास्त्र यांसारख्या शाखांमधील डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक आहे. तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समन पदांसाठी आयटीआय/एनटीसी/एनएसी प्रमाणपत्र आणि एसएसएलसी/एसएससी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बेसन लाडू आता चिकटणार नाही तोंडात, बनवताना फक्त टाका हा एक पदार्थ, VIDEO
सर्व पहा

भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क पदांनुसार वेगवेगळे आहे. पोस्ट कोड 01 ते 20 आणि 40 साठी 750/- इतके अर्ज शुल्क आहे, जे लेखी परीक्षेस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना परत केले जाईल. एससी/ एसटी, महिला, पीडब्ल्यू बीडी, माजी सैनिक यांना पूर्ण परतावा मिळेल. पोस्ट कोड 21 ते 39, 41 आणि 42 साठी 500/- इतके अर्ज शुल्क आहे. ज्याचा परतावा लेखी परीक्षेस उपस्थित राहणाऱ्यांना मिळेल. या भरतीची सविस्तर पीडीएफ लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. पीडीएफवर क्लिक करून या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता. अर्जाची लिंक देखील इच्छूक उमेदवारांना बातमीमध्ये देण्यात आली आहे. अर्ज भरताना प्रत्येक वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज असणार आहेत. लेखी परीक्षा आणि मुलाखत या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. काही निवडक पदांसाठीच कौशल्य चाचणी असेल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ISRO- सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विविध पदांवर नोकर भरती, अर्जाचे सर्व Detail बातमीमध्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल