TRENDING:

मंत्र्याचा ताफा पाहताच अंगात 'सिंघम' आला, जालन्याच्या DSPची फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलकाच्या कमरेत लाथ, पाहा VIDEO

Last Updated:

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न एका आंदोलकाने केला होता. पण पोलिसांनी हे आंदोलन हाणून पाडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
jalana news
jalana news
advertisement

Jalna News : रवी जैस्वाल, जालना : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न एका आंदोलकाने केला होता. पण पोलिसांनी हे आंदोलन हाणून पाडलं आहे. विशेष म्हणजे हे आंदोलकाला हिसकावून लावताना पोलीस उप अधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलमध्ये लाथ मारल्याचे समोर आले आहे. या घटनेचा आता व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. तसेच नागरीकांकडून संताप व्यक्त होतोय.

advertisement

जालना जिल्ह्यात आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे येणार होत्या. त्यामुळे जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना हुसकावून लावलं. त्यानंतर पोलीस आंदोलकाला नेत असताना पोलीस उप धीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईल लाथ मारल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना आता कॅमेरात कैद झाला.

advertisement

एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत आहे, असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. आज पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्यात स्वातंत्र्य दिनासाठी आले असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.

advertisement

यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेताच स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आंदोलकाला ताब्यात घेऊन जात असतानाच डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी धावत येत अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लाथ घातल्याच पहायला मिळालं.

advertisement

दरम्यान अनंत कुलकर्णी यांच्या अशा वागण्यावरून सध्या सर्वत्र सध्या टीका होत आहे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायासाठी न्याय मागणाऱ्या आंदोलकाला लाथ मारल्याने पोलिस प्रशासनाविरोधात सामान्य जनतेमध्ये राग व्यक्त होतोय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मंत्र्याचा ताफा पाहताच अंगात 'सिंघम' आला, जालन्याच्या DSPची फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलकाच्या कमरेत लाथ, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल