TRENDING:

Jalgaon News : भरधाव खाजगी बसने बैलगाडीला उडवलं,अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO

Last Updated:

जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद येथे एक चालक आपली बैलगाडी घेऊन रस्त्यावर उभा होता. या दरम्यान मागून येणार्‍या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी तो उभा होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jalgaon News : इम्तियाज अहमद, प्रतिनिधी, जळगाव : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भरधाव खाजगी बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलगाडीला उडवल्याची घटना घडली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद येथे अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात बैलगाडीचा चक्काचुर झाला आहे, बैलगाडीचा मालक हा सुदैवाने या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. पण त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.त्यामुळे या अपघाताचा थरार पाहून अंगावर काटा येतो आहे.
Jalgaon news
Jalgaon news
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद येथे एक चालक आपली बैलगाडी घेऊन रस्त्यावर उभा होता. या दरम्यान मागून येणार्‍या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी तो उभा होता.याचवेळी मागून एक जळगाव ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावर पुण्याला जाणारी भरधाव खाजगी बस येते आणि ती बैलगाडीला उडवून टाकते. यावेळी बैलगाडीला धडक बसताच त्याच्यावरचा चालक रस्त्यावर पडतो पण नंतर तो पु्न्हा आपल्या पायावर उभा राहतो.त्यामुळे या अपघातात सुदैवाने तो बचावतो.

advertisement

[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-18-at-4.33.11-PM-2026-03-931c93b8edac2a4086add51305a06fd7.mp4"][/video]

सुदैवाने जरी या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी हा अपघात खूपच भयानक होता. विशेष म्हणजे या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.त्यामुळे या अपघाताचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या अपघाताचा थरार पाहून अंगावर काटा येतो आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

दरम्यान या अपघाताच्या घटनेनंतर ग्रामस्थ प्रचंड आक्रामक झाले होते. कारण याआधी देखील अपघाताच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी या अपघातानंतर महामार्गावर वाकोद गावाजवळ गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यामुळे अपघातानंतर आणि आंदोलनानंतर आता प्रशासनाला जाग येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon News : भरधाव खाजगी बसने बैलगाडीला उडवलं,अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल