बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत झाली होती रॅली
बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसची जन संवाद यात्रा रावेरच्या सावदा खिरोदा दरम्यान मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत एकाचा जखमी होऊन मृत्यू झाल्याने काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी जखमीला स्वतःच्या वाहनात नेऊन उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
या घटनेबाबत बाळासाहेब थोरात यांनी देखील दुजोरा
जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दुजोरा दिला आहे. थोरात म्हणाले, की ही दुर्दैवी घटना आहे. रॅली सुरू असताना मोटरसायकल घुसल्याने ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
वाचा - Rohit Pawar : 'एका पगारात तीन कर्मचारी येत असतील तर...', रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा
काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद
काँग्रेसच्या जनसंवाद यात्रा मंगळवारी तिवसा विधानसभा मतदार संघातील कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी वलगावात पोहचली अन या यात्रेचा पुढचा प्रवास सुरु झाला. वलगावनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीस्मारक असलेल्या नया अकोला येथे यात्रा पोहचल्यानंतर अस्थिस्मारकाला अभिवादन करण्यात आले. भ्रष्ट मोदी सरकार व खोके सरकारची पोलखोल या जनसंवाद यात्रेतून करण्यात आली.
वलगाव येथे जनसंवाद यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार ॲड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, आमदार धीरज लिंगाडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलु देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, निरंजन टकले, कलावती बांदुरकर , आकांक्षा ठाकूर, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, बाळासाहेब हिंगणीकर, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
