पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, 'कोरोनाच्या काळात देखील जनतेमध्ये राहणारे आम्ही लोक तुमच्यासारखे घाबरून घरी बसणारे लोक नाही आहोत. जळगावची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. जळगाव व रावेरच्या लोकांना माहिती आहे की तुतारीची पिपाणी कशी करावी आणि ती ते केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला असल्याचं' फडणवीस यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. जळगावचे सुपुत्र उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई मधून उमेदवारी दिली त्यावर विरोधकांनी टीका केली. उज्वल निकम यांनी अजमल कसाबला बदनाम केलं. यांना चिंता कोणाची आहे कसाबच्या बदनामीची आहे. हे लोकं आमच्या शहिदांचा अपमान करतात. ते म्हणतात करकरेंना अजमल कसाबने गोळी मारली नाही. न्यायालयाने देखील सांगितलं की करकरेंना गोळी अजमल कसाबने मारली, अंतरराष्ट्रीय समुदायाने देखील सांगितलं की अजमल कसाबने गोळी मारली असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.