हा हल्ला रविवारी रात्री रामेश्वर कॉलनीतील राज विद्यालयासमोर घडला. हर्षल हा त्याचा मित्र नितीन देशमुखसोबत बोलत बसला होता, त्याचवेळी दोन दुचाकींवरून ८ ते १० जण तिथे आले. त्यांनी हर्षलला 'तू आमच्या जुन्या वादात सहभागी होता' असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आतच एका आरोपीनं हर्षलच्या मानेवर आणि डोक्यावर चॉपरने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हर्षल जमिनीवर कोसळला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.
advertisement
हर्षलचा मित्र नितीन देशमुख याने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. याचा फायदा घेत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. नितीन देशमुखने तातडीने हर्षलला रुग्णालयात दाखल केले. हर्षलच्या मानेवर आणि डोक्यावर खोल जखमा झाल्या असून, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी मित्र नितीन देशमुख याने पोलिसांना घडलेली सर्व माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.