भुसावळ रेल्वे मंडळातील भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी 14 व 15 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. या मेगा ब्लॉगच्या पार्श्वभूमीवर आज अचानक सकाळी सचखंड एक्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला. ही गाडी अकोला पूर्णामार्गे वळवण्यात आली, त्यामुळे मनमाड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्राशांची प्रचंड गौरसोय झाली. शेकडो प्रवाशांना मध्येच उतरून इतर वाहनांनी प्रवास करावा लागला.
advertisement
प्रवाशांची गैरसोय
मध्य रेल्वेने 183.94 किलोमीटर लांबीच्या भुसावळ मनमाड विभागदरम्यान नवीन तिसरा मार्ग बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या कामासाठी 14 व 15 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय आहे. या मेगा ब्लॉगचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या मार्गावर इंटरलॉकिंग केल्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
