साहित्य आणि कृती
आयुर्वेदिक साबण बनवण्याचे साहित्य (साधी कृती)
कोरफड - 2 मोठे तुकडे
सोप बेस -१००-२०० ग्रॅम (ग्लिसरीन किंवा गोठवलेला साबण बेस)
कडुलिंब पाला - आवश्यकतेनुसार
खोबरेल तेल -१०-१५ थेंब
मॉइश्चरायझिंग घटक: १ चमचा मध किंवा बदामाचे तेल
साचे (Soap Molds)
महागाईचा फटका स्वयंपाक घराला, डाळींचे भाव तब्बल ऐवढ्या रुपयांनी वाढले, कारण काय?
advertisement
कृती (Steps)
वितळवणे: सोप बेसचे लहान तुकडे करा आणि डबल बॉयलर पद्धतीने किंवा मायक्रोवेव्हमध्ये वितळवा.
मिश्रण: वितळलेल्या बेसमध्ये कोरफड, कडुलिंब रस, (नीम/हळद), मध आणि एसेंशियल ऑइल टाकून चांगले ढवळा.
साच्यात ओतणे: मिश्रण साच्यात ओता आणि वरचे बुडबुडे काढून टाका.
थंड करणे: २-३ तास किंवा कडक होईपर्यंत थंड होऊ द्या.
टीप:
1. नैसर्गिक घटकांमुळे हे साबण त्वचेवर सौम्य असतात, परंतु तरीही वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट घेणे उत्तम.
2. हे साबण दीर्घकाळ टिकून राहते. त्यामुळे प्रवासात जाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून हा साबण नेऊ शकता.





