TRENDING:

धक्कादायक! जीवंत शेतकऱ्याचं नाव शहीद जवानाच्या शिलालेखात, आमदार अनावरणाला आले अन्...

Last Updated:

चाळीसगावमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. शहीद जवानांच्या नावे असलेल्या शिलालेखात चक्क जिवंत शेतकऱ्याचा शहीद जवान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, 18 ऑगस्ट, नितीन नांदूरकर : चाळीसगावमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. शहीद जवानांच्या नावे असलेल्या शिलालेखात चक्क जिवंत शेतकऱ्याचा शहीद जवान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी आमदारांच्या हस्ते या शिलालेखाचं अनावरण झालं. शहीद जवानांसाठी बनवण्यात आलेल्या शिलालेखात आपलं नाव पाहून या शेतकऱ्याला धक्का बसला आहे. त्याने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान  पंचायत समिती प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी या प्रकरणात कुठलीही माहिती न देता या शिलालेखावरून शेतकऱ्याचं नाव हटवलं आहे.
News18
News18
advertisement

काय आहे नेमकं प्रकरण?  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव पंचायत समिती प्रशासनानं जिवंत शेतकऱ्याला शहीद जवान केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.   सागर बबनराव नागणे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.  15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती परिसरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते तालुक्यातील शहीद जवानांचे नाव असलेल्या शिलालेखाचं अनावरण करण्यात आलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचेच्या विकरांवर गुणकारी, घरीच बनवा सोप्या पद्धतीने आयुर्वेदिक साबण, Video
सर्व पहा

या शिलालेखात चक्क जिवंत असलेले शेतकरी सागर बबनराव नागणे यांचं नाव आल्यानं हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत सागर नागणे यांनी पंचायत समिती प्रशासनास जाब विचारला असता प्रशासनाने कुठलीही माहिती न देता शिलालेखावरून त्यांचं नाव हटवलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
धक्कादायक! जीवंत शेतकऱ्याचं नाव शहीद जवानाच्या शिलालेखात, आमदार अनावरणाला आले अन्...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल