TRENDING:

धक्कादायक! तिकीट मागितल्याने आरपीएफ कर्मचाऱ्याची रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण

Last Updated:

आरपीएफ कर्मचाऱ्यानं रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, 30 ऑगस्ट : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईवरून प्रयागराजकडे जाणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसमध्ये तिकीटाबाबत विचारणा केल्याच्या रागातून  सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचाऱ्यानं  मुंबई स्टॉपचे सी.टी.आय. मनोज सिन्हा यांना अरेरावी करत मारहाण केली आहे, तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरपीएफ कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईवरून प्रयागराजकडे जाणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसमधून आरपीएफ कर्मचारी ए. के. अजमेरा हे सहपत्नी मुंबईहुन सतन्याला निघाले होते. दरम्यान इगतपुरी रेल्वे स्थानकानजीक मुंबई स्टॉपचे सीटीआय मनोज सिन्हा यांनी त्यांच्याकडे तिकीटाची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे कुठलेही तिकीट अथवा रेल्वे पास नव्हता. यावरून वाद वाढला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डॉक्टरची कमाल, आफ्रिकेत गाजवलं मैदान, पॉवरलिफ्टिंगमध्ये केली 7 पदकांची कमाई
सर्व पहा

तिकीट विचारल्याचा राग आल्याने आरपीएफ कर्मचारी ए. के अजमेरा यांनी सीटीआय मनोज सिन्हा यांना आरेरावीची भाषा करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी अजमेरा यांच्याविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
धक्कादायक! तिकीट मागितल्याने आरपीएफ कर्मचाऱ्याची रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल