जालना कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्यात यावर्षी प्रचंड पाऊस पडला. जालना शहराच्या मागील 50 वर्षांच्या इतिहासात कधीही एवढा पाऊस झाला नव्हता. जालन्यात फक्त 3 तासांत 116.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यासह राज्यात होत असलेला पाऊस हा तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. आणखी 2 ते 3 दिवस या पावसाचा जोर राहील. यानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
Jalna Rain: जालन्यात पावसाचा हाहाकार! 3 तासात तब्बल 116 मिमी पाऊस, 50 दुकानं पाण्याखाली, Video
पंडित वासरे म्हणाले, "सध्या राज्यात पडत असलेला पाऊस हा परतीचा नाही. 15 सप्टेंबरपासून राजस्थान येथून मान्सून माघारी फिरला आहे. पण, त्याचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. आयएमडीचा अहवाल बघता यावर्षी देखील याच कालावधीत मान्सून माघारी फिरेल."
काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अचानक झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. लोकांच्या शेतात आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शकत्या असल्याने लोकांनी जीविताची काळजी घ्यावी. गोठ्यातील जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. शेतात साचलेलं अतिरिक्त पाणी काढून टाकावे आणि विद्युत तारांपासून सावध राहावे. विहिरीच्या आसपास फिरकू नये, असा सल्ला सुचना पंडित वासरे यांनी दिला आहे.