Mumbai: गावचे सरपंच मुंबई पाहायला आले, लग्नाला निघाले पण रस्त्यातच काळाचा घाला, मुलुंड मेट्रो अपघातात मृत्यू
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Mumbai Metro Slab Collapsed : मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा पिलर कोसळूला उत्तर प्रदेशातील सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबई : वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो-४ या ग्रीन लाइनवरील मुलुंडमधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील मृत्यू झालेले रामधनी यादव हे उत्तर प्रदेशातील एका गावचे सरपंच आहेत.
वडाळा- ठाणे- कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचे काम सुरू असताना शनिवार दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मेट्रोचा खांब उंचावरून खाली कोसळला. त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा आणि चारचाकी वाहनावर तो कोसळला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी आहेत. घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. सरपंच रामधनी यादव यांच्या वारसाला ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
advertisement
सरपंच मुंबई पाहायला आले, नातेवाईकाच्या लग्नाला निघाले पण रस्त्यातच काळाने गाठलं
मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा पिलर कोसळूला उत्तर प्रदेशातील सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यामधून सरपंच रामधनी यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मुलुंड परिसरात सरपंच यादव यांच्या मित्राचे ऊसाचे दुकान आहे. याच दुकानातून कळव्यात एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी सरपंच आणि माजी सरपंच रिक्षावाला बबलू यादवसह निघाले होते.
advertisement
मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास मेट्रोच्या सिमेंट पिलर कोसळून सरपंच रामधन यादव यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर घटनेची माहिती मिळताच यादव कुटुंबीयांवर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे. सरपंच मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मात्र या मेट्रोच्या सिमेंट पीलर रिक्षावर कोसळल्यामुळे त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
नातेवाईकांकडून या घटनेमध्ये जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. खरंतर सरपंच रामधन यादव आणि माजी सरपंच मुंबई फिरून दोन दिवसात गावी उत्तर प्रदेश राज्यातील जौनपुर जिल्ह्यात जाणार होते. मात्र त्यापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली.
advertisement
स्लॅब कोसळला, एमएमआरडीएचे स्पष्टीकरण
आज दुपारी १२:१५ वाजता मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील मेट्रो लाईन बांधकामाच्या पियर पी १९६ जवळ एक घटना घडली, जिथे पॅराफीटचा एक भाग उंचीवरून पडला आणि तो रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटो रिक्षावर आदळला. अपघातात एक मृत्यू तर तीन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे आणि आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरविली जात आहे. मेट्रो प्रकल्प पथक घटनास्थळी आहे आणि बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधून मदत कार्य आणि घटनास्थळ सुरक्षित करण्याचे काम करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 5:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai: गावचे सरपंच मुंबई पाहायला आले, लग्नाला निघाले पण रस्त्यातच काळाचा घाला, मुलुंड मेट्रो अपघातात मृत्यू








