Googleचं Android यूझर्सला मोठं गिफ्टं! Chrome च्या यूझर्सला मिळताय हे फीचर्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Google Chrome चे लेटेस्ट Android अपडेटमध्ये Pinned Tabs फीचर रोलआउट झाले आहे. आता यूझर्स आवश्यक टॅबला पिन करु शकतात. जे ब्राउझर बंद केल्यानंतर सर्वात वर दिसतात. जाणून घेऊया या नविन फीचरचा वापर कसा करावा आणि याचे फायदे काय?
नवी दिल्ली : गूगलने डिसेंबर 2025 मध्ये घोषणा केली होती की, ते अँड्रॉइड यूझर्ससाठी Chrome ब्राउझरमध्ये पिन्ड टॅब फीचर आणणार आहेत. आता कंपनीने ही सुविधा रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. हे फीचर आधी Windows, Mac आणि Linux सारख्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये उपलब्ध होते. मात्र आता Android यूझर्सही याचा फायदा घेऊ शकतील.
नवीन Chrome for Android व्हर्जन 144.0.7559.132 अपडेटनंतर यूझर्स आपल्या आवश्यक टॅबला पिन करु शकतात. या फीचरची खास गोष्ट म्हणजे, पिन केलेला टॅब नेहमी टॅब लिस्टच्या सर्वात वर दिसेल. एवढेच नाही तर तुम्ही ब्राउझर बंदही केले, तरीही पुन्हा ओपन केल्यावर पिन केलेला टॅब सर्वात वरच दिसेल.
advertisement
पिन केलेले टॅब कसे वापरावे
क्रोममध्ये टॅब पिन करण्यासाठी, तो काही सेकंदांसाठी टॅप करा. उघडणाऱ्या मेनूमधून ‘Pin tab’ ऑप्शन निवडा. टॅब लगेच वरच्या बाजूला लॉक होईल. जर तुम्हाला टॅब अनपिन करायचा असेल, तर तीच प्रक्रिया पुन्हा करा किंवा ती बंद करा.
advertisement
गूगल म्हणते की, हे फीचर यूझर्सला तेथूनच काम सुरु करण्यात मदत करेल, जिथे त्यांनी थांबवलं होतं. म्हणजेच ज्या वेबसाइट्सचा तुम्ही नियमित वापर करतात, त्या वारंवार सापडण्याची गरज पडणार नाही.
हे अपडेट अँड्रॉइडवर डेस्कटॉपसारखा अनुभव देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, अँड्रॉइडच्या नवीन डेस्कटॉप मोडसह चांगले काम करण्यासाठी गुगल क्रोमला देखील अपडेट करत आहे. डेस्कटॉप मोड हा अँड्रॉइड 16 QPR1 चा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे, जे डिव्हाइस बाह्य डिस्प्लेशी कनेक्ट केलेले असताना मल्टी-विंडो लेआउट देते. क्रोमचे हे नवीन फीचर अँड्रॉइड यूझर्ससाठी ब्राउझिंग एक्सपीरियन्सला आणखी सोपं आणि प्रोडक्टिव्ह बनवू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 4:52 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Googleचं Android यूझर्सला मोठं गिफ्टं! Chrome च्या यूझर्सला मिळताय हे फीचर्स






