TRENDING:

विजांचा कडकडाट आणि वादळी वारा, आस्मानी संकटात काय करावं, काय नको?

Last Updated:

Thunderstorm Safety Tips: राज्यात पुढील काही दिवस आस्मानी संकटाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाट सुरू असताना काय करावं आणि काय नको? जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील तीन ते चार दिवस वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तसेच यलो अलर्ट देण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी पावसाची व गारपीटीची शक्यता असल्याने शेत पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच विजांपासून नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे व सावधानता बाळगणे देखील गरजेचे असणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या कालावधीमध्ये नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
विजांचा कडकडाट आणि वादळी वारा, आस्मानी संकटात काय करावं, काय नको?
विजांचा कडकडाट आणि वादळी वारा, आस्मानी संकटात काय करावं, काय नको?
advertisement

पाऊस व वादळी वाऱ्यामध्ये काय करावं, काय नको?

1) मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये, वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

2) गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.

advertisement

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट, या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट

3) मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.

4) वोजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

advertisement

5) अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.

6) शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

7) जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

सर्व नागरीकांनी वादळी वारे. वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा असं आवाहन ज्यांना येथील निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
विजांचा कडकडाट आणि वादळी वारा, आस्मानी संकटात काय करावं, काय नको?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल