advertisement

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट, या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:

राज्याच्या काही भागांत पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागांत गारांचा पाऊसही पडू शकतो.

+
News18

News18

मुंबई : राज्याच्या काही भागांत पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागांत गारांचा पाऊसही पडू शकतो. या बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. पाहुयात पुढील 24 तासांत राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
मुंबईत 1 एप्रिल रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतर हलका पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. कमाल तापमान 29  ते 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंशांपर्यंत राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल. पुण्यात सकाळी ढगाळ वातावरण असेल तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असेल.
advertisement
नाशिकमध्ये हलक्या पावसासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस राहील. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो. नागपूरमध्ये पावसाचा जोर जास्त असेल. हलका ते मध्यम पाऊस आणि गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान 24 अंश सेल्सिअस असेल. वारे ताशी 50 किलोमीटर वेगाने वाहू शकतात.
advertisement
छत्रपती संभाजीनगर या शहरात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस अपेक्षित आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहील. मेघगर्जना आणि वादळी वारेही अनुभवायला मिळतील. हवामान खात्याने नागरिकांना सावध राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट, या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement