छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. यामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते गुंटूर ही गाडी जालना येथून सायंकाळी 5 वाजता सुटेल. तसेच, गुंटूर ते छत्रपती संभाजीनगर ही गाडी 19 सप्टेंबरपर्यंत जालना येथेच थांबणार आहे.
advertisement
जालना-पूर्णा दरम्यान विशेष रेल्वे
उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दक्षिण मध्य रेल्वेने जालना-पूर्णा-जालना मार्गावर साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अनारक्षित असेल आणि दर रविवारी जालना ते पूर्णा मार्गावर धावेल. ही गाडी 1 जून ते 27 जुलै या कालावधीत दर रविवारी सायंकाळी 5 वाजता सुटेल आणि परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर मार्गे जालना येथे रात्री 8:50 वाजता पोहोचेल. तसेच, जालना ते पूर्णा दरम्यान दर गुरुवारी ही गाडी सोडण्यात येईल.






