TRENDING:

Bamboo Exhibition: बांबूचा टूथब्रश अन् बांबूचेच दागिने, जालन्यात भरलंय प्रदर्शन, लगेच करा खरेदी

Last Updated:

Bamboo Exhibition Jalna: सध्याच्या काळात पर्यावरणपुरक बांबूच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. जालन्यात अशाच वस्तूंचं खास प्रदर्शन भरवण्यात आलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना: सध्याच्या काळात बांबूपासून बनवलेल्या पर्यावरणपुरक वस्तूंना मागणी असते. जालना शहरातील महेश भवन येथे बांबूच्या सुबक आणि सुंदर अशा वस्तूंचं प्रदर्शन सुरू आहे. जालनाकर तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत आहे. बांबूच्या लागवडीला तसेच बांबू पासून बनवलेल्या वस्तूंना चालना मिळावी म्हणून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबतची अधिक माहिती सुयोग कुलकर्णी यांनी दिली आहे. ‌

advertisement

रानउद्योग फार्म प्रोड्युसर कंपनी आणि वेणुवेध संशोधन संस्था पुणे यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केलं आहे. हे प्रदर्शन 11 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान जालना शहरातील महेश भवन येथे आयोजित करण्यात आल आहे. विविध प्रकारचे दागिने, टूथब्रश, खुर्च्या, टेबल, शोभेच्या वस्तू इत्यादी आकर्षक वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.

उन्हाळ्यात तुम्हीही जनावरांना हिरवा चारा देताय? होऊ शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या उपचार

advertisement

बांबूच्या विविध वस्तू

चावीला लावण्याची किचन, अत्यंत अखीव रेखीव अशा देवी देवतांच्या प्रतिमा, घरातील उपयोगी वस्तू उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या या वस्तूंना नागरिकांची चांगली मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे.‌ हातमागावर तयार केलेल्या हस्तकला रेखांकित असलेल्या या वस्तू अत्यंत सुबक असल्याने नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या वस्तूंना मिळत आहे.

advertisement

प्रदर्शनाचा लाभ घ्या

मागील तीन ते चार वर्षांपासून आम्ही बांबूवर काम करत आहोत. परंतु हे आपल्यापर्यंत मर्यादित न राहता सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक जीवनशैली अंगी करावी व बांबूंपासून बनवलेल्या वस्तूंचा अंगीकार करावा यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजक सुयोग कुलकर्णी यांनी सांगितलं. जालना शहरांमध्ये 13 एप्रिल पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केला आहे.

advertisement

महिलांना प्रशिक्षण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‎हिवाळ्यात रम घेतल्यावर खरंच शरीर गरम राहतं? 99 टक्के लोक गैरसमजाचे बळी, कारण..
सर्व पहा

दरम्यान, या प्रदर्शनामध्ये महिलांना हातमागाचं व हस्तकलेच प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सात महिलांनी या प्रदर्शनात येऊन प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. तर 12 व 13 एप्रिल रोजी महिलांचा प्रतिसाद आणखी वाढणार आहे. बांबूचा प्रचार प्रचारासाठी हे प्रदर्शन एक मैलाचा दगड ठरणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Bamboo Exhibition: बांबूचा टूथब्रश अन् बांबूचेच दागिने, जालन्यात भरलंय प्रदर्शन, लगेच करा खरेदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल