वाहतूक व्यवस्थेतील बदल
शनिवारी (ता. 19) सकाळी आठ ते रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाखालून व बाजूने अंबडकडे येणारी अवजड वाहने थांबवून ही वाहने पाचोड-अंबड मार्गेजालन्याकडे जातील. तर जालन्याकडून शहागडकडे जाणारी वाहने अंबड पाचोड मार्गे जातील.
रविवारी (ता.20) सकाळी तीन वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाखालून व बाजुने अंबडकडे येणारी सर्व अवजड वाहने थांबवून पाचोड जामखेड फाटा-जामखेड-किनगाव चौफुली-बदनापूर मार्गे जालनाकडे जातील. जालनाकडून येणारी वाहने बदनापूर-किनगाव चौफुली पाचोड मार्गे शहागडकडे जातील. शहापूर ते शहागड व अंबड ते पाचोड मार्गावरील गावातील अवजड वाहनांनी याच मार्गाचा वापर करावा. तसेच पारनेर फाटा ते छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंतच्या गावातील अवजड वाहनांनी याच मार्गाचा वापर करावा.
advertisement
MHADA Lottery 2025: आमदार-खासदारांची चंगळ, फक्त साडेनऊ लाखात मिळणार घर!
सोमवारी (ता. 21) पहाटे तीन ते रात्री 11 वाजेपर्यंत हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाणपुलाखालून व बाजूने अंबडकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करून ही वाहने वडीगोद्री-पाचोड जामखेड फाटा-जामखेड-किनगाव चौफुली-बदनापूरमार्गे जालनाकडे जातील. जालन्याकडून येणारी वाहने बदनापूर-किनगाव चौफुली जामखेड-जामखेड फाटा पाचोड मार्गे शहागडकडे जातील. तसेच अंबडकडून जालन्याकडे जाणारी अवजड वाहने पहाटे तीन ते रात्री 11 वाजेदरम्यान बंदी असून ही वाहने किनगाव चौफुली-बदनापूर मार्गे जालनाकडे जातील. जालनाकडून अंबडकडे येणारी अवजड वाहने बदनापूर-किनगाव चौफुली-जामखेड-पाचोड शहागडकडे जातील.
पोलिस अधीक्षक यांचे आदेश
19 ते 21 जुलै या कालावधीत जालनाकडून घनसावंगीकडे जाणारी वाहने रोहनवाडी-सुतगिरणी मार्गे घनसावंगीकडे जातील व घनसावंगीकडून जालनाकडे जाणारी वाहने याच मार्गे जालनाकडे जातील. घनसावंगीकडून बीडकडे जाणारी वाहने तीर्थपुरी-गोंदी-शहागड मार्गे बीडकडे जातील, असे आदेश पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत






