कसा झाला प्रवास?
निलेश पगारे हा जालना शहरातील कन्हया नगर येथील झोपडपट्टीत राहणारा रहिवासी आहे. निलेशच शिक्षण जालना शहरातीलच जे ई एस महाविद्यालयात पूर्ण झालं. या महाविद्यालयातून त्याने त्याचं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. निलेशचे आजोबा देखील पेशीवर लेखक होते त्यामुळे निलेशला देखील लिखाणाची आवड लागली. पुढे काळ वेळ नुसार त्याने आपल्या लिखाणात बदल केला आणि प्रॉफेटिक प्रकाराकडे तो वळला.
advertisement
PHOTOS : गळ्यात चैन, हातात 25 हजाराचा टॅब, हा डिजिटल भिकारी 50 रुपयांपेक्षा कमी पैसे घेतही नाही
प्रोफेटिक म्हणजेच भविष्याचा वेध घेणारे साहित्य. या प्रकारात शेकडो कविता सादर केल्यानंतर निलेशला इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये स्लम टू वर्ल्ड डेमोंसट्रेशन प्रोफेटीक वर्डस्मिथ हे टायटल आणि हार्वर्ड वर्ल्ड रिकॉर्डमध्ये बिईंग वर्ड अँम्ब्लीशअर अँड प्रोफेटीक ऑथर असे शीर्षक निलेश पगारेना प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
महाविद्यालयानं 7 वेळा बाहेर काढलं; आज ठरतोय अभ्यासक्रम, पाहा कोण आहे सौरभ Video
मला खूप आनंद
मी नुकतेच इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लंडनचा हावर्ड वर्ल्ड रेकॉर्ड अशी दोन रेकॉर्ड मला मिळाले आहेत. याचा मला खूप आनंद आहे. गेल्या 14 वर्षांपासून मी लिखाणात प्रयत्न करतोय, सिनेक्षेत्रात प्रयत्न करतोय. आतापर्यंत मी अनेक ई-बुक्स लिहिले आहेत. मात्र ते अप्रकाशित आहेत. अप्रकाशित राहण्याचे कारण म्हणजे मला काहीतरी जगा वेगळं करायचं होतं. शेवटी या दोन रेकॉर्डच्या रूपाने मला ते मिळालं आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे, असं निलेश पगारे सांगतो.