महाविद्यालयानं 7 वेळा बाहेर काढलं; आज ठरतोय अभ्यासक्रम, पाहा कोण आहे सौरभ Video

Last Updated:

ज्या महाविद्यालयातून 7 वेळा रस्ट्रीकेट केलं आज तोचं तरुण त्या महाविद्यालचा अभ्यासक्रम ठरवतो आहे.

+
News18

News18

नागपूर, 10 ऑक्टोबर : आयुष्य हे अनिश्चित आणि पावलो पावली काहीतरी नवं शिकवून जाणारी लांब प्रोसेस आहे. जे या मार्गांवर सातत्याने आणि निर्भीडपणे चालत राहतात विजयश्री अश्याच्याचं गळ्यात विजयाची माळ घालत असते. सातारा जिल्ह्यातील कोरगाव इथल्या लहानश्या गावात जन्मलेल्या आणि शाळा महाविद्यालयात जेमतेम असणाऱ्या तरुणाचा प्रवास असाच आहे. ज्या महाविद्यालयातून 7 वेळा रस्ट्रीकेट केलं आज तोचं तरुण त्या महाविद्यालचा अभ्यासक्रम ठरवतो आहे. आजवर त्या तरुणाने 600 हून अधिक शाळा,महाविद्यालय आणि इतरत्र पब्लिक स्पीकर म्हणून मंच गाजवाला. अनेक शहरांत,समाज माध्यमावर तो तरुण आज एक प्रख्यात पब्लिक स्पीकर, मोटिवेशनल स्पीकर, स्टोरी टेलर, लेखक अश्या अनेक उपाध्यनी नावारुपस आला आहे. त्या तरुणाचे नाव म्हणजे सौरभ भोसले हे होय. आज त्याच्या या एकंदरीत प्रवासा बद्दल जाणून घेऊया.
कसा आहे प्रवास?
सोशल मीडियावर वावरणाऱ्या अनेक मराठी तरुणाईला सौरभ भोसले हे नावं तस ओळखीचे आहे. सौरभ आपल्या सातारी मराठी भाषेतुन तुरुणाईला आपलेसे वाटावे असे कन्टेन्ट मांडत असतो. जगण्याच्या संघर्षातून आलेले अनुभव, धमाल किस्से आणि सकारात्मक दृष्टीकोन इत्यादी मुळे अल्पवाधितच सौरभ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रख्यात झाला आहे. मात्र त्याचा इथवाराचा प्रवास देखील तितकाचा रोमांचक आणि संघर्षमय राहिला आहे.
advertisement
21 नामांकित कंपन्यामध्ये काढले नाव
शाळा महाविद्यालयात तो अभ्यासात जेमतेम होता, मात्र आयुष्याच्या एका वळणावर त्याची मैत्री पुस्तकांशी झाले आणि वाचनाची आवड निर्माण झाली. दिशाहीन आयुष्यात पुस्तकांशी मैत्री झाली आणि आयुष्यात काहीतरी करू शकू असा आत्मविश्वास दृढ झाला. इंजिनिअरिंग करत असतांना ते सोडून द्याव लागले, अभ्यासात फार मन नं लागणाऱ्या याच सौरभने पुढे जाऊन स्वतःला सिद्ध केलं आणि एकदोन नव्हे तर 21 नामवंत कंपन्यामध्ये त्याची नोकरीसाठी निवड झाली.
advertisement
एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत असताना असे लक्ष्यात आले कि आपण उत्तम बोलू शकतो, आपल्या अनुभव इतरांना आपलेसे वाटतात, आपल्या गोष्टी ऐकतांना लोकांना मजा येते आपण उत्तम संवाद साधू शकतो असे कळताचा सौरभने अनेक ठिकाणी पब्लिक स्पिकिंग, लोकांमध्ये जाऊन संवाद साधने सुरू ठवले. विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयाने विद्यार्थी जीवनात सौरभला 7 वेळा महाविद्यालयारतून बाहेर काढले त्याचा महाविद्यालयात सौरभला मोठ्या सन्मानाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आले. आज त्याचा महाविद्यालयाचा अभ्यासक्रम सौरभ डिझाईन करत आहे.
advertisement
मनातील गोष्टी मांडतो
आज घडीला सौरभ भोसलेचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या दौऱ्यानिमित्त नागपुरात आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात सौरभ भोसले स्पेशल शो आयोजित केला आहे. या शोला तुफान गर्दी होते आहे. आगामी काळात पुण्याला शेवटचा चौदावा शो असणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मी एक व्यक्ती असून जे विचार हल्लीच्या तरुणाईचे आहे तेच विचार मी माझ्या पद्धतीने मंचावर मांडत असतो. मूळचा सातारचा असल्याने सातारी भाषेचा टोन लोकांना आवडतो. मोटिवेशन पेक्षा मी स्टोरी टेलिंगवर जास्त विश्वास करतो. या प्रोग्राम ला आलेले प्रेक्षकांशी थेट संवाद साधत मी त्यांच्या मनातील गोष्टी मांडतो आहे,असं सौरभनं सांगितलं.
मराठी बातम्या/करिअर/
महाविद्यालयानं 7 वेळा बाहेर काढलं; आज ठरतोय अभ्यासक्रम, पाहा कोण आहे सौरभ Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement