एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा 40 अंशापार गेला असून उन्हामुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी बाहेर फिरणे टाळत आहेत. मात्र, पशुपक्षी या मुक्या प्राण्यांचे या काळात हाल होत आहेत. त्यांच्यासाठी अन्नपाण्याची व्यवस्था विविध ठिकाणी व्हावी, यासाठी रेनिल या सामाजिक संघटनेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. अन्न तसेच पाणी दोन्ही एकत्र राहावेत यासाठी विशेष किट मागवून तयार करण्यात आले आहे. दोन महिने ही मोहीम चालू राहणार आहे.
advertisement
Success Story : आई-वडिलांचं छत्र हरवलं, आयुष्याशी जिद्दीनं लढला, अमरावतीचा तेजस झाला PSI
वाढती उष्णता लक्षात घेता पक्ष्यांना पाणी आणि खाद्य याची उणीव भासू नये, यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार गतिविधींमुळे शरीर ते सहन करू शकत नाही. वन्यप्राणी तसेच पशुपक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचत आहेत. अशा वेळी त्यांचा बळी जाण्याची भीती असते. अशा प्रकारे पक्ष्यांच्या अन्नपाण्यासाठी किट तयार करण्यात आल्या असून, मोफत वाटप केल्या जात आहेत. हातभार लावायचा असल्यास पक्षी मित्रांनी पुढाकार घ्यावा सुरक्षेची, आरोग्याची काळजी घ्यावी, बर्ड फीडरची योग्य काळजी घेण्यासाठी नियमितपणे साफसफाई करणे, योग्य ठिकाणी ठेवणे, पक्षी आणि इतर प्राण्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे आवश्यक आहे.
मांजर तसेच इतर प्राण्यांच्या वावरापासून किट दूर ठेवावे, बियाणे तसेच पाण्याची साफसफाई करावी, पक्ष्यांसाठी योग्य अन्न निवडा, फीडरची काळजी घ्या या नियम अटी पक्षिमित्र ज्ञानेश्वर गिराम यांच्या सल्ल्यानुसार देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात अन्न, पाणी अशी दोन्ही मिळून एकत्र असलेल्या 100 किट्स वाटप करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये हातभार लावायचा असल्यास पक्षी मित्रांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन प्रतीक गावडे यांनी केलं आहे.





