TRENDING:

20 रुपयांत मिळतायेत घटस्थापनेसाठी घट, जालन्यातील या ठिकाणाला नक्की द्या भेट

Last Updated:

नवरात्री उत्सवाच्या काळात घटस्थापनेसाठी मातीच्या घटांना मागणी असते. जालन्यात 25 रुपयांपासून घट मिळत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 12 ऑक्टोबर: नवरात्र उत्सव आता अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची रेलचेल बाजारात पाहायला मिळत आहे. जालना शहरात घट स्थापनेसाठी आवश्यक असणारे घट अगदी 20 रुपयांपासून मिळत आहेत. त्याच बरोबर धान्य उगवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मातीची कुंडी देखील मोठ्या संख्येने आल्या आहेत. मातीपासून तयार झालेल्या विविध वस्तू इथे उपलब्ध असल्याने जालना शहरातील नागरिक या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
advertisement

नवरात्रीसाठी आवश्यक घट

जालना शहरातील नूतन वसाहत भागात राहणारे विलास लावरे मागील 27 वर्षांपासून नवरात्रीसाठी आवश्यक असणारे घट आणि धान्य उगवण्यासाठी आवश्यक कुंडी विक्री करतात. नवरात्र उत्सव तोंडावर असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं लावरे यांनी सांगितलं. नवरात्र उत्सवासाठी साहित्य बरोबरच त्यांच्याकडे मातीची चूल, भाजी शिजवण्यासाठीचे भांडे, पणती, धूप असे विविध साहित्य उपलब्ध आहे. स्टेनलेस स्टीलच्या तुलनेत मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न हे जास्त पौष्टिक आणि आरोग्यदायी असते. त्यामुळे शहरातील नागरिकांचा कल देखील मातीच्या भांड्यांकडे वाढला असल्याचं लावरे यांनी सांगितलं.

advertisement

माझा जीव घुटमळतोय..., भक्ताच्या स्वप्नात आली देवी, आता नवरात्रीत मोठा उत्सव

काय आहे किंमत ?

नवरात्रीसाठीचे घट 20 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर भाजी शिजवण्यासाठी तवली 40 ते 50 रुपये, पाणी थंड ठेवण्यासाठी छोटा माठ 80 ते 90 रुपये, मातीची चूल 50 ते 60 रुपये, आरतीसाठीची धूप 40 रुपयांत उपलब्ध आहे. विलास लावरे यांच्याकडे जालना जिल्ह्यातील पिरकावल्यान येथून माती पासून बनवलेल्या वस्तू येतात. मागील 27 वर्षांपासून लावरे हे नूतन वसाहत भागात माती पासून बनवलेले भांडे विकत आहेत. नवरात्र उत्सव आणि दिवाळीच्या तोंडावर व्यवसाय चांगला चालत असल्याचे लावरे यांनी सांगितलं.

advertisement

नवरात्र उत्सवात प्रत्येकजण देवीची आराधना करता असतो. घटस्थापना पासून या उत्सवाला प्रारंभ होतो. यावर्षी 15 ऑक्टोबर म्हणजेच रविवारपासून घटस्थापना होत आहे. या उत्सव काळात देवीची मनोभावे सेवा केली जाते. तसेच नऊ दिवस देवीसमोर गरबा खेळण्याची परंपरा देखील महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
20 रुपयांत मिळतायेत घटस्थापनेसाठी घट, जालन्यातील या ठिकाणाला नक्की द्या भेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल