यावर्षीही मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने वाढलेला साठाही कमी होत चालला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पात 4.80 दलघमी 7 टक्केच साठा उरला आहे. त्यामुळे आता दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटवली होती, परंतु यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेला पाऊस दमदार होता.
advertisement
मे महिन्यात झालेल्या पावसाने पाणीपातळी वाढली होती, जून महिन्यातही एक दोन जिल्ह्यांतील मध्यम तलावांत 7 टक्के साठा आहे. आता गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये वाढलेला साठाही आता हळू हळू कमी होत चालला आहे. जुलै महिना सुरू झाल्यानंतरही ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या पाणीपातळी अहवालात साठ्यात घट दर्शविण्यात आली. जिल्ह्यातील 7 मध्यम तलावांमध्ये 4.80 दलघमी म्हणजे 7 टक्के साठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाण्याची स्थिती अशी आहे
जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्पाची पातळी जोत्याखाली गेलेली आहे. कल्याण गिरीजा प्रकल्पात 1.497 दलघमी (15 टक्के), बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात 2.396 दलघमी (20 टक्के) पाणी आहे. भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात 0.95 दलघमी (16 टक्के), धामना प्रकल्पात 0.91 दलघमी (16 टक्के), जाफ्राबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पात 0.53 दलघमी (9 टक्के) तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात 0.23 दलघमी (3 टक्के) साठा आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे केवळ भोकरदन, जाफ्राबाद तालुक्यातील तलावातील साठ्यात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये जलसाठ्यांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे यंदा दमदार पाऊस होणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे.