चव्हाण आणि जरांगेंमध्ये बंद दाराआड चर्चा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत माजी खासदार रजनीताई पाटील ह्यादेखील उपस्थित आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. मागच्याच आठवड्यात स्वराज्य संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. बैठकीनंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपली भूमिकाही स्पष्ट केली होती.
advertisement
वाचा - CM पदाचा चेहरा मागणाऱ्या ठाकरेंचं एक पाऊल मागे; मविआपुढे ठेवला नवा प्रस्ताव
जरांगे पाटलांचा इशारा
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण दिले नाही तर राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. यावरुन सरकारला इशारा देखील दिला आहे. मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय निर्णयामुळे महायुतीसह महाविकास आघाडीत्या नेत्यांचं टेन्शन वाढले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चांगला चालला होता. महायुतीला मोठ्या प्रमाणात याचा फटका बसला. मराठवाड्यात तर भाजपला सर्वात मोठा धक्का बसला. भाजपच्या लोकसभेला 13 जागा कमी झाल्या. त्यामुळे विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालला तर महायुतीचे सरकार जाऊ शकते.