Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मागणाऱ्या ठाकरेंचं एक पाऊल मागे; मविआपुढे ठेवला नवा प्रस्ताव
- Published by:Shreyas
Last Updated:
16 ऑगस्टला झालेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी त्यांच्या भाषणातून केली.
उदय जाधव, प्रतिनिधी
मुंबई : 16 ऑगस्टला झालेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी त्यांच्या भाषणातून केली. शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगावा, आपण त्याला पाठिंबा देऊ, असं उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले. तसंच ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युलाही उद्धव ठाकरेंनी अमान्य केला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री यामध्ये पाडापाडी होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी करणारा उद्धव ठाकरेंचा पक्ष आता एक पाऊल मागे आला आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ज्याच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मान्य नसल्याचं उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलं आहे, यामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठोस उत्तर दिलं नव्हतं, त्यामुळे आता किमान चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2024 4:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मागणाऱ्या ठाकरेंचं एक पाऊल मागे; मविआपुढे ठेवला नवा प्रस्ताव