जालना : जालना शहरातील आठ बचत गटांच्या 25 महिलांनी तयार केलेली सॅनेटरी पॅडला गुजरात, मध्यप्रदेश, ओडिशा आणि उत्तराखंडमधील डेहराडून येथून मागणी मिळाली आहे. त्यामुळे या महिलांनी तयार केलेली सॅनेटरी पॅडला परराज्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचबाबत घेतलेला हा आढावा.
जालना शहरातील जालना महापालिका आणि उजास अंतर्गत 25 महिलांना पुनर्वापर करण्यायोग्य सॅनिटरी पॅड निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रकल्पा अंतर्गत महिलांनी तयार केलेले सॅनेटरी पॅड परराज्यात पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत 16 हजार सॅनेटरी पॅडची निर्यात करण्यात आली आहे. यातून महिलांना चांगला आर्थिक लाभदेखील होत आहेत.
advertisement
पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महापालिकेच्या माध्यमातून महिला बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. या धर्तीवर या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देत आर्थिक उन्नत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फेब्रुवारी महिन्यापासून आदित्य बिर्ला एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्टच्या मदतीने महापालिकेच्या वतीने मासिक पाळीत लागणाऱ्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या सॅनिटरी पॅडची निर्मिती करण्याचे युनिट सुरू करण्यात आले आहेत.
या युनिटमध्ये 8 बचत गटांतील 25 महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. दिवसाकाठी महिलांना 300 ते 350 रुपये मिळतात. घरचे काम करून महिला या युनिटमध्ये काम करीत आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या या कापडी सॅनिटरी पॅडला मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, देहराडून, आदी भागातून मागणी आहे. त्यामुळे अशाप्रकारे विविध राज्यांमध्ये महिन्याकाठी 8 हजार सॅनिटरी पॅडची विक्री केली जात असल्याची माहिती प्रकल्प संचालक राजाभाऊ डुकरे यांनी दिली.
Solapur News : मशिदीत नेमकं काय असतं?, मुस्लिमेतर बांधवांनी जाणुन घेतले आतील उपक्रम
युनिटमधील महिलांना प्रशिक्षण -
महापालिकेच्या वतीने आदित्य बिर्ला एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्टशी 30 महिन्यांचा करार करण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. कच्चा माल पुरवठा, उत्पादन आणि विक्रीत महिलांना मदत केली जात आहे.
मधक्रांतीसाठी अनुदान प्रस्ताव कसा आणि कुठे सादर करावा?, संपूर्ण माहिती, VIDEO
महिलांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू -
महापालिकेंतर्गत बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. महिलांची सामाजिक, आर्थिक उन्नती करण्यासह सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कापडी आणि पुनर्वापर करता येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याचे युनिट सुरू करण्यात आले आहे. या युनिटमध्ये सर्व महिला कार्यरत असून, उत्पादित माल परराज्यात पाठविला जात असल्याचे महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले.