शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवणे, रस्त्यावर गाड्या लावणाऱ्या फेरीवाल्यांना त्या रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगणे. याचबरोबर सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांनी मिळून शहरामध्ये तब्बल आठ ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याची योजना आखली आहे.
Samruddhi Mahamarg: मुंबई-नाशिकचं अंतर अडीच तासावर, समृद्धीचा शेवटचा टप्पाही खुला होणार, तारीख ठरली
advertisement
या अंतर्गत होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या तरुणांना व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वर्गणीतून पगार देण्यात येणार आहे. हे ट्रॅफिक वॉर्डन शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये थांबून वाहतुकीचे नियमन करणार आहेत.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी पाहता हा नावीन्यपूर्ण उपक्रम महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि व्यापारी यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. सध्या आठ ट्रॅफिक वॉर्डन कार्यरत असून भविष्यात यांची संख्या 25 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. शहरातील नागरिकांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सदर बाजार स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी लोकल 18 शी बोलताना केले.





