शहरात विविध लॉज आणि हॉटेलवर सर्रास वेश्याव्यवसाय सुरू आहेत. शहरातील बस स्टँड रोडवर असलेल्या मोक्षा आणि वैष्णवी लॉजवर देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी चर्चा केल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक आणि पोलिसांनी या दोन्ही लॉजवर छापा टाकून ही कारवाई केली.
advertisement
Weather Alret : पुढील 24 महत्त्वाचे, महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट, IMD नं दिला अलर्ट
यात मोक्ष लॉजचे मालक सचिन नंदु पवार वय 30 रा. वाटुर ता. परतुर जि. जालना, मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव रा. खरपुडी ता. जि. जालना तसेच वैष्णवी लॉजचे मॅनेजर कैलास रतन कुमार वय 30 रा. सावा ता. जि. चित्तोडगड राज्य राजस्थान. ह.मु. वैष्णवी लॉज जालना यांचा समावेश होता. तसेच ग्राहक पंकज भाऊसाहेब निकाळजे वय 25 वर्ष रा. जांमवाडी ता. जि. जालना, तुषार हरिश बत्रा वय 24 वर्ष रा. परतुर, रोहित संजय बोर्डे वय 26 वर्ष रा. जांमवाडी ता. जि. जालना, करण रवी वाहुळे वय 20 वर्ष रा. जामवाडी ता. जि. जालना यांच्यासह एकूण 13 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. यापैकी पश्चिम बंगाल राज्यातील 06, आसाम राज्याच्या 03 आणि छ. संभाजीनगर येथील 04 महिला होत्या.
आरोपींकडून 81,750/- एवढा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सातही आरोपींविरुद्ध सदरबाजार पोलीस ठाण्यात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3,4,5,6 प्रमाणे प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






