EV कार चार्जचं टेन्शन मिटलं, रनिंगमध्ये होईल आपोआप चार्ज; 170 किमी नो टेन्शन!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
शासकीय तंत्रनिकेतनच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी गतिज ऊर्जेची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या एव्हरेजमध्ये 70 ते 75% पर्यंत वाढ होऊ शकते.
जालना : जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या गाडीचं ॲव्हरेज वाढवणारी ट्रिक जालन्यातील पोरांनी तयार केलीये. शासकीय तंत्रनिकेतनच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी गतिज ऊर्जेची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या ॲव्हरेजमध्ये 70 ते 75% पर्यंत वाढ होऊ शकते.
इलेक्ट्रिक वाहनांचा चलन आता सगळीकडेच वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये असलेल्या बॅटऱ्यांवर ही वाहने वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत धावतात परंतु बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा चार्ज करावे लागते. ऐनवेळी बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर चार्जिंग स्टेशन नसेल तर मात्र अडचण होते.
काय आहे मॉडेल?
रीजनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम व्हेईकल व्हील असं या प्रोजेक्टचं नाव आहे. यामध्ये गाड्यांच्या चाकांना असलेल्या वेगाचा वापर करून पुन्हा ऊर्जा निर्मिती करण्यात आली आहे. ही तयार झालेली ऊर्जा साठवण्यासाठी आणखी एक डिस्चार्ज झालेली बॅटरी बसवण्यात आली असून इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी 100% खर्च झाल्यानंतर पन्नास टक्के ऊर्जा चाकांच्या वेगापासून तयार होते.
advertisement
पुन्हा या 50 टक्के उर्जेपासून 25% ऊर्जा तयार होते. अशा पद्धतीने एखादी इलेक्ट्रिक गाडी 100 किलोमीटर ॲव्हरेज एका चार्जमध्ये देत असेल तर हीच गाडी 170 ते 75 किमी ॲव्हरेज देऊ शकते. अशा पद्धतीने इलेक्ट्रिक गाड्यांची 70 ते 75 टक्के वाढवणारी ही विद्यार्थ्यांची कल्पना वाखाणण्याजोगी आहे.
advertisement
केवळ 16 हजार रुपये खर्च करून विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट तयार केला असून यामध्ये आणखी भांडवलाची गुंतवणूक केल्यास या कल्पनेला मूर्त रूप आणखी चांगल्या पद्धतीने देता येऊ शकेल, असं अभिषेक राऊत या विद्यार्थ्याने लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 8:27 PM IST








