माझा प्रॉब्लेम काय आहे की मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही... पण मुद्दा काय आहे, मतचोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या. आता हे महिनाभर चालेल. समाजामध्ये असेही काही लोक असतात जे निंदा करतात, अलीकडे मी ही अशी लोक तयार करू लागलो आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
advertisement
जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली पण घेतो: जयंत पाटील
या देशांमध्ये अलीकडे मोठा प्रॉब्लेम झाला आहे. वाचाळवीरांची फार संख्या वाढली आहे. वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार आहे. सर्व जातीवर प्रेम करा.पण समजामध्ये भेद करू नका... हा जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली घेतो, अशी टीका जयंत पाटील यांनी पडळकर यांच्यावर केली.
देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो तर... जयंत पाटील यांची टीका
तसेच या सरकारने ही सत्ता वोट चोरीने ही सत्ता मिळवली आहे. लोकशाहीवर घाला घालणाऱ्याना आपण किती पोसायचं आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तुमच्या माझ्या मताचा अधिकार दिला त्याला सुरुंग लावण्याचं काम यांनी केले. या देशात कोणाला खड्ड्यात घालायचा आणि कोणाला वर काढायचं या पाठीमागे एक शक्ती काम करू लागले. या देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो. तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती, असेही पाटील म्हणाले.