नियतीने तुमचा शेवट केला - जयकुमार गोरे
एका कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत असताना ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी एक स्टेटस जोरदार व्हायरल झाला होतं. सुरुवात तुम्ही केली आता शेवट मीच करणार... परंतु सुरुवात तुम्ही केली होती पण नियतीने तुमचा शेवट केला, असं सांगत जोरदार टोला जयकुमार गोरे यांनी लगावला. यावेळी जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता लगावला. लोकांनी कधीही विश्वासाचं राजकारण केलं नाही. ज्या अजितदादांनी उमेदवारी जाहीर केले ती उमेदवारी नाकारून दुसरीकडे उमेदवारी घेतली गेली. सत्तेशिवाय माणसं जगू शकत नाहीत, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांना टोला लगावला आहे.
advertisement
गेली 20 वर्षे मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न - जयकुमार गोरे
मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला, आज तेच स्वतः संपलेले आहेत. गेली 20 वर्षे ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना नियतीने चोख उत्तर दिलेलं आहे. त्यांचा हिशेब नियतीने केला आहे, असं म्हणत जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीकास्त्र सोडलं. आपल्याला सूडाचे राजकारण करायचे नाही. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी, जिल्ह्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला राजकारण करायचंय, असंही गोरे यावेळी म्हणाले.
रामराजेंकडून अजितदादांची भेट
दरम्यान, चुलत बंधू संजीवराजे यांच्या घरी ईडीने छापा टाकल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली होती. ईडीने तबब्ल पाच दिवस कारवाई केली होती. या कारवाईनंतर रामराजे गट अस्वस्थ झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादांची भेट घेतल्याने आता साताऱ्याचं राजकारण आणखी पेटणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
