TRENDING:

जुन्नर आंबेगावच्या पट्ट्यात बिबटे जास्त का? वनअधिकारी स्मिता राजहंस यांनी कारणं सांगितली

Last Updated:

ऊसामध्ये बिबट्यांना सुरक्षित निवारा मिळाला, त्यामुळे बिबट्याची प्रजनन क्षमता वाढली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, प्रतिनिधी, जुन्नर: जुन्नर वन विभागात पूर्वीही बिबट्या होते मात्र ते डोंगरी भागात आणि भीमाशंकर अभयारण्यात होते. पण नंतरच्या काळात नागरी भागात बिबट्यांचे सर्रास दर्शन घडू लागले. मानव आणि बिबट संघर्ष निर्माण झाला.
जुन्नर बिबट्या
जुन्नर बिबट्या
advertisement

ऊस शेतीमुळे बिबट्या सुखावलाय आणि वाढला

जुन्नर वन विभागात येणाऱ्या चारही तालुक्यात (जुन्नर-आंबेगाव-खेड-शिरूर) पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता झाली. धरणे झाली, कालवे-पाट पाण्याची व्यवस्था अस्तित्वात आली. पाण्याची शाश्वत उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांची पीक पद्धती बदलली, ऊस शेती वाढली. शेतकऱ्यांची पाळीव जनावरे, ऊस शेती व मुबलक पाण्यामुळे बिबट्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने रानावनातून बिबटे ऊस शेतात स्थलांतरित झाले.

advertisement

ऊसामध्ये बिबट्यांना सुरक्षित निवारा मिळाला, त्यामुळे बिबट्याची प्रजनन क्षमता वाढली. बिबट्याची जन्माला आलेली पिल्लेही चांगली जगू लागली. त्यामुळे इथे बिबट्या सुखावलाय आणि वाढलाय देखील... असे जुन्नर वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.

मंचर-दोन बिबट्यांसह दोन बछड्यांची वनविभागाकडून सुखरूप सुटका

आंबेगाव तालुक्यातील मंचर वनपरिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरत असलेल्या बिबट्यांच्या हालचालीमुळे नागरिकांची भीती वाढली होती. याचदरम्यान वन विभागाने स्थानिकांच्या मदतीने दोन बिबट्यांसह दोन बछड्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे.

advertisement

वाघाळे मळा परिसरातील एका घराजवळ लावलेल्या पिंजर्‍यात रात्री उशिरा दोन महिने वयाचे बिबट्याचे बछडे सापडले. त्यांना तत्काळ उपचारासाठी अवसरी वनउद्यानात हलवण्यात आले. तसेच काही अंतरावर दुसरा बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनकर्मी घटनास्थळी दाखल झाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

सध्या परिसरात वन विभागाचे गस्त वाढवण्यात आले असून स्थानिकांनी सतर्क राहण्याचे आणि हालचाली दिसल्यास त्वरित कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जुन्नर आंबेगावच्या पट्ट्यात बिबटे जास्त का? वनअधिकारी स्मिता राजहंस यांनी कारणं सांगितली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल