श्वेता मॅडमच्या मृत्यूची माहिती मिळताच पाठक कुटुंबीयांसह शाळेला धक्का बसला आहे. विद्यार्थी वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी ९ मेला श्वेता पाठक काही विद्यार्थ्यांसह बालीमध्ये रिव्हर राफ्टींगचा आनंद घेत होत्या. यावेळी अचानक त्यांची बोट पलटली. रिव्हर राफ्टींग करत असताना श्वेता यांनी लाईफ जॅकेट परिधान केलं नव्हतं. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने श्वेता यांना स्वत:ला वाचवता आलं नाही. दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा बुडून मृत्यू झाला.
advertisement
बिर्ला स्कूलच्या मुख्याध्यापिका रंजना जांगरा आणि पाठक यांचे पती सध्या बाली येथे आहेत. ते श्वेता यांचा मृतदेह मायदेशी आणण्याची व्यवस्था करत आहेत. या प्रकरणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी X वर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये, पाठक यांचे पार्थिव इंडोनेशियाहून भारतात नेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि इंडोनेशिया येथील भारतीय दूतावासाकडून मदत मागितली.
या दुर्घटनेनंतर शाळेने एक निवेदन जारी केलं. ज्यात त्यांनी श्वेता पाठक यांचं वर्णन विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका आणि मार्गदर्शक होत्या, असा उल्लेख केला. तसेच शाळेने जनतेला श्वेता पाठक यांच्या कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याचे आणि खोटी माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं.
