TRENDING:

BJP Shiv Sena Clash : डोंबिवलीत मतदानापूर्वी 'हायव्होल्टेज ड्रामा'; शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी रात्रीच उचललं, परिसरात तणाव

Last Updated:

Kalyan Dombivli: प्रभाग क्रमांक २९ मधील भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर मंगळवारी रात्री डोंबिवलीत मोठी राजकीय खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक २९ मधील भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संतप्त शिवसैनिकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला असून कल्याण-डोंबिवलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.
डोंबिवलीत मतदानापूर्वी 'हायव्होल्टेज ड्रामा'; शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी रात्रीच उचललं, परिसरात तणाव
डोंबिवलीत मतदानापूर्वी 'हायव्होल्टेज ड्रामा'; शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी रात्रीच उचललं, परिसरात तणाव
advertisement

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या रविवारी प्रभाग २९ च्या भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी त्यांना मारहाण केली होती. या हल्ल्यात ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते.

advertisement

रात्रीच पोलिसांची कारवाई

मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन्ही उमेदवारांना ताब्यात घेतले. अटकेच्या प्रक्रियेदरम्यान दोघांचीही प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री उशिरा डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात उमेदवारांच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी तुकाराम नगर आणि रुग्णालय परिसरात जवळपास २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर अटक झाल्याने हे दोन्ही उमेदवार स्वतःचे मतदान करू शकणार का? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

advertisement

'ही तर पोलिसांची दडपशाही', आमदार राजेश मोरे यांचा आरोप

घटनेची माहिती मिळताच शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. "आमच्या उमेदवारांची प्रकृती स्थिर नसतानाही पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही सरळ सरळ दडपशाही असून प्रशासनाने सूडबुद्धीने कारवाई केली आहे. जर उमेदवारांच्या जिवाला काही झाले, तर त्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार असतील," असा इशारा आमदार मोरे यांनी दिला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांतीला ‘हे’ दान करा, भाग्य चमकेल, पण ‘ती’ चूक महागात पडेल, Video
सर्व पहा

सध्या डोंबिवलीत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून मतदानाच्या दिवशी याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Shiv Sena Clash : डोंबिवलीत मतदानापूर्वी 'हायव्होल्टेज ड्रामा'; शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी रात्रीच उचललं, परिसरात तणाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल