स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले होते. उल्हासनगरमध्ये पडलेल्या ठिणगीची झळ कल्याण-डोबिंवलीतही बसू लागली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे आपल्या होमग्राउंडवर चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपात खेचून आणले. शिंदे गटानेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कल्याण-डोंबिवली, ठाण्यातील या कुरघोडीचे प्रकरण दिल्ली दरबारी पोहचले होते.
advertisement
कल्याण-डोंबिवलीत कोण ठरला मोठा भाऊ?
दोन्ही बाजूने सुरू असलेल्या कुरघोडीमुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानंतर राज्यात महायुतीचे प्रयत्न सुरू झाले. मुंबईनंतर आता कल्याण-डोबिंवलीत जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे. 'सीएनएन न्यूज १८'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट मोठा भाऊ असणार आहे. कडोंमपा मध्ये भाजप ५४ जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना शिंदे गट ६८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
भाजपचे कार्यकर्ते स्वबळासाठी आग्रही होते. मात्र, महायुतीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्याने शिंदे गटात समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबईत काय ठरलं?
मुंबईमधल्या 227 जागांपैकी 137 जागांवर भाजप तर 90 जागांवर शिवसेना लढणार आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातून जागा देणार आहेत. एबी फॉर्मचे वाटप करून उद्या दोन्ही पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
