कल्याण : राज्यातील महापालिका निवडणुकांची बिगुल वाजला आहे. अर्ज छाननी दरम्यानच काही ठिकाणी भाजप, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्याची औपचारिक घोषणा निवडणूक आयोगाकडून होईल. मात्र, कल्याण-डोंबिवलीमधील बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
एकीकडे राज व उद्धव आणि काँग्रेस भाजपा आणि शिवसेनेच्या नावाने टाहो फोडत असताना दुसरीकडे मात्र त्यांचे शिलेदारांनी मैत्री जपून आपल्याच उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले, ज्यामुळे निवडणूक निकाल लांब राहिला प्रचार सुरु होण्याआधीच भाजपा आणि शिवसेनेचे एकदोन नाही तर तब्बल ११ नगरसेवक उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच फेरीत निवडून आले. या सगळ्यात सर्वांत महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचा चेहरा किंवा मोठं नेतृत्व कल्याण डोंबिवलीत नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांनी व्यक्तीगत पातळीवर निर्णय घेत भाजपा शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून दिले असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जिल्हा आणि पालिका नेतृत्वाचा चेहरा नसल्याने त्यांनाही व्यक्तीगत पातळीवर निर्णय घेत भाजपा आणि शिवसेनेला मदत केली.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काही ठिकाणी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशी असलेली मैत्री आणि शेजार धर्म पाळत भाजपाचे उमेदवार काही ठिकाणी बिनविरोध निवडून येण्यासाठी तर काही ठिकाणी राजू पाटील यांनी उमेदवारच उभे केले नाही. ज्याचा फायदा थेट भाजपाला झाला आहे.
तर, आश्चर्य म्हणजे ज्या शिवसेने विरोधात स्वतः मनसेचे माजी आमदार राजू पाटील थेट दंड थोपाटतात त्या थेट विरोधक असलेल्या शिवसेनेला काही ठिकाणी व्यक्तीगत तर काही ठिकाणी वरीष्ठ पातळीवरील मैत्री जपण्याकरता मनसेने मदत केली असल्याची चर्चा आहे. मात्र, एवढं सगळं करण्यामागे राजू पाटील यांची खेळी असल्याचे सांगितले जात आहे.
>> कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना कशी झाली मदत?
भाजप बिनविरोध
1. मंदाताई सुभाष पाटील २७ अ
मनसेने या ठिकाणी एक अर्ज भरला होता. इतर कोणत्या पक्षांनी अर्ज भरला नव्हता. काहींनी अर्ज भरले होते. परंतु, त्यांचे अर्ज अवैध ठरले. पण सर्वात महत्वाचे म्हणजे मंदा पाटील या मनसेच्या माजी नगरसेविका होत्या. त्यांनी शिवसेनेत ठरलेला प्रवेश काही तासांआधीच रद्द करुन भाजपात प्रवेश केला. मंदा पाटील यांचे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्याशी असलेले नातेसंबंध आहेत. त्याशिवाय, राजू पाटील तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात मैत्री आहे. यामुळे राजू पाटील यांनी मनसेच्या सुवर्णा पाटील यांना अर्ज मागे घ्यायला लावला. यामुळे मंदा पाटील बिन विरोध निवडून आल्या. म्हणजेच शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला मदत केली
2. ज्योती पवन पाटील २४ ब
या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने आणि शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिले होते. पण त्यांनी मागे घेतल्याने भाजपाच्या ज्योती पाटील यांचा विजय झाला. ठाकरे गट, मनसे, काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला मदत केली
3. आसावरी नवरे २६ क
उबाठा मनसे दोन्ही काँग्रेस अपक्ष यापैकी कोणीच येथे अर्ज भरले नाही आणि ज्यांनी भरले होते अर्ज त्यांचे अर्ज अवैध ठरले. म्हणजे शिवसेना ठाकरे गट, मनसे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला मदत केली.
4. रंजना मितेश पेणकर २६ ब
शिवसेना ठाकरे गट, मनसे, दोन्ही काँग्रेस अपक्ष यापैकी कोणीच येथे अर्ज भरले नाही आणि ज्यांनी भरले होते अर्ज त्यांचे अर्ज अवैध ठरले. म्हणजे उबाठा मनसे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला मदत केली.
5. रेखाताई चौधरी १८ अ
शिवसेना ठाकरे गट, मनसे दोन्ही काँग्रेस अपक्ष यापैकी कोणीच येथे अर्ज भरले नाही आणि ज्यांनी भरले होते अर्ज त्यांचे अर्ज अवैध ठरले.
शिवसेना - ४ उमेदवार बिनविरोध
1. रमेश म्हात्रे २४ अ
ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेली होती. त्यांचे उमेदवार प्रियांका पाटील यांनी अर्ज भरला होता. पण त्यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचा विजय झाला म्हणजे शिवसेना ठाकरे गट, मनसे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला मदत केली.
2. विश्वनाथ राणे २४ क
या प्रभागातून मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आला. याही ठिकाणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपली मैत्री जपली असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना ठाकरे गट, मनसे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला मदत केली
3. वृषाली जोशी २४ ड
या ठिकाणी मनसेच्या निलम दाभोळकर यांनी अर्ज भरला होता. पण बिन विरोध निवडून आलेल्या वृषाली जोशी यांचे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्याशी त्यांचे चांगेल संबंथ आहेत. त्यामुळे या वॉर्डातून मनसेनं उमेदवार मागे घेतला. यामुळे शिवसेनेच्या वृषाली जोशी या बिनविरोध निवडून आल्या.
4. हर्षल मोरे २८ अ
हर्षल मोरे हे शिवसेना आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव आहेत. ही जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली होती. तर मनसेचे इथे सिटींग नगरसेवक होते. मात्र यंदा कोणीच येथे अर्ज भरला नाही आणि ज्यांनी भरला त्यांचे अर्ज बाद झाले.
