याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 3 वाजता देवीचा अभिषेक, पूजन आणि श्रृंगार झाल्यानंतर दानवे कुटुंबाने पहाटे 5 वाजता देवीची आरती केली. परंपरेनुसार यानंतर दर्शनाला सुरुवात झाली. लांबून आलेल्या भाविकांना देवीचं दर्शन मिळावं नवरात्रीतील 9 दिवस दररोज 18 तास मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले राहणार आहे.
Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, 8 जिल्ह्यांना अलर्ट
advertisement
भाविकांच्या दानातून आलेल्या चांदीने देवीचा गाभारा सजला आहे. राजस्थानमधील 7 कारागिरांनी चांदीवर नक्षीकाम केलं आहे. मागील दोन महिन्यांपासून मंदिरात ही सजावट लावण्याचं काम सुरू होते. त्यामुळे यंदा देवीचं रूप आणखी उठून दिसणार आहे. कर्णपुरा यात्रेत नवरात्रीत एकदा तरी प्रत्येक भाविक हजेरी लावतो. नवसपूर्ती झाल्यावर नवस फेडणारे अन् मनोकामना घेऊन देवीसमोर साकडे घालणारे भाविक हजारोंच्या संख्येने येतात.
पहाटे अनवाणी येण्याचा संकल्पही हजारो भाविक करताना दिसतात. यंदा जत्रेतील व्यापाऱ्यांना आणि भाविकांना एकाच छताखाली सेवा मिळावी म्हणून पोलीस तसेच आरोग्य यंत्रणेला एकाच दालनाखाली ठेवण्यात आलं आहे. यात्रेत स्वच्छता ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत.
यावर्षी यात्रेमध्ये 535 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. कर्णपुरा देवी यात्रेत कायमच भाविकांच्या सुरक्षेला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाही देखील 350 पोलीस अंमलदार, 6 पोलीस निरीक्षक, 30 सहायक पोलीस निरीक्षक आणि 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून यात्रेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.