मनी हाईस्ट ही भंयकर चोरी दाखवणारी एक वेबसीरीज आहे. या वेबसीरीजप्रमाणे चेहऱ्यावर मास्क घालून
हातात बंदुक घेऊन हे चोरटे कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पोहोचतात.त्यानंतर बंदुकीच्या धाकेवर बँक कर्मचाऱ्यांनी आधी डांबतात त्यानंतर अख्खी बॅक साफ करतात.
वेबसीरीजमध्ये आरोपी हा सगळा मुद्देमाल एका फिरत्या घरात ठेवतात.पण या घटनेत चोरटे चोरी झालेला मुद्देमाल पडक्या घराच्या छतावर फेकतात. आता हा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यानंतर मंगळवेढा पोलिसांनी हा मुद्देमाल कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.त्यामुळे आता या प्रकरणात बॅक लुटणाऱ्या टोळीला कधी अटक होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
चडचण येथील बँक लुटल्यानंतर दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल घेऊन पळ काढला होता. मात्र, मंगळवेढा व कर्नाटक पोलिसांची गेल्या दोन दिवसापासून परिसरातील गस्त वाढल्यामुळे दरोडेखोरांना पुढे जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी लुटलेल्या ऐवजाची बॅग हुलजंती येथील एका बंद घराच्या छतावर टाकून दिली होती.
पोलिसांच्या तपासात ही बॅग आढळून आली. मंगळवेढा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून ही बॅग चडचण पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या बॅगेत 136 पॅकेट मधून 6.5 किलो सोने व 41.5 लाख रोकड मिळाल्याचे कर्नाटक विजयपुर जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले आहे.
या बॅगेत काही महत्त्वाची कागदपत्रे असल्याची चर्चा असून, त्यातून दरोडेखोरांचा तपास लागण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर चडचण पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.