काय आहे आजचे आरक्षण?
मंत्रालयातील नगरविकास विभागाने काढलेल्या सोडतीनुसार, कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी (आदिवासी प्रवर्गासाठी) आरक्षित झाले आहे. या सोडतीमुळे अनेक दिग्गज इच्छुकांची गणिते बिघडली असून, ज्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाले आहे, त्या गटातील नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महापौरपद आरक्षित झाल्यामुळे आता पक्षांना आपल्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे. विशेषतः प्रभाग रचनेनंतर अनेक दिग्गज नेत्यांनी महापौरपदावर डोळा ठेवला होता, मात्र आरक्षणाच्या चिठ्ठीने काहींना दिलासा तर काहींना धक्का दिला आहे.
advertisement
कडोंमपा महापौरसाठी दावेदार कोण?
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षणासाठी दोन नावे चर्चेत आहेत. हर्षला थविल आणि रमेश जाधव हे दोन नगरसेवक महापौर पदाचे दावेदार आहेत.
कल्याण-डोंबिवलीत मोठी घडामोड....
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बुधवारी मोठी घडामोड झाली. मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटाने मनसे आणि ठाकरेंच्या बंडखोरासह महापौरपदावर दावा केला. शिंदे गट-मनसेच्या या खेळीने युतीमधील भाजपचा गेम झाल्याची चर्चा आहे. भाजपने कल्याण-डोंबिवली महापालिकेत ५० जागा जिंकल्या आहेत. तर, शिंदे गटाने ५३ जागांवर विजय मिळवला. मनसेच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटाने भाजपकडून महापौर पदावर होणारा संभाव्य दावाच संपवून टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
