TRENDING:

बाप मारला अन् खुर्ची मिळवली! अनुकंपा नोकरीसाठी पोटच्या पोरीनेच दिलं मिल्कशेकमधून विष; बॉयफ्रेंडने केला प्रताप उघड

Last Updated:

एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकेल अशा या थरारकांडाचा उलगडा खुद्द प्रियकरानेच सूडबुद्धीने केल्याने पोलीसही हादरून गेले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून माणुसकीला आणि रक्ताच्या नात्यालाही काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या वडिलांच्या निधनानंतर मिळणाऱ्या 'अनुकंपा' तत्त्वावरील नोकरीच्या हव्यासापोटी एका मुलीनेच प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या पित्याला विष देऊन ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकेल अशा या थरारकांडाचा उलगडा खुद्द प्रियकरानेच सूडबुद्धीने केल्याने पोलीसही हादरून गेले आहे.
News18
News18
advertisement

पोलीस खात्यात वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी एका मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. आर्या जयंत बाल्लावार (वय 22) असे या पोलीस कन्येचे नाव असून, तिने 24 मार्च 2023 रोजी वडील जयंत बाल्लावार यांना मिल्कशेक मधून विष देऊन त्यांची हत्या केली होती. विशेष म्हणजे, या खुनानंतर अवघ्या दोन महिन्यात ती वडिलांच्या जागी पोलीस दलात रुजूही झाली. मात्र, वर्षभरानंतर प्रियकरानेच या साऱ्या कटाचे पुरावे पोलिसांच्या हवाली केल्याने हा मर्डर उघड झाला आहे.

advertisement

वडिलांचा खून कसा केला?

आर्या बाल्लावार आणि आशिष शेडमाके यांचे बालपणापासून प्रेमसंबंध होते. आशिषचे वडीलही पोलीस दलात होते, त्यांच्या निधनानंतर आशिषला दोन महिन्यात अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. हीच 'शॉर्टकट' आयडिया आर्याने उचलली, तिचे वडीलही पोलीस दलात होते. तिने आशिषच्या मदतीने वडिलांची हत्या करण्याचा कट रचला. 25 मार्च 2023 रोजी आर्याने वडिलांना विषारी मिल्कशेक दिला. ड्युटीवर गेल्यावर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी हा मृत्यू नैसर्गिक वाटला, पण तो एक सुनियोजित खून होता.

advertisement

दोघांमध्ये नेमकं कुठं बिनसलं?

वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या तातडीने पोलीस दलात भरती झाली. आशिष आणि आर्या दोघांचे प्रशिक्षण एकत्र सुरू झाले. मात्र नियतीचा खेळ असा की, प्रशिक्षणावरून परतल्यानंतर आशिषला एका गंभीर गुन्ह्यात पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले. आशिषची नोकरी जाताच आर्याने त्याच्याशी संबंध तोडले. स्वतःसाठी पित्याचा खून करायला लावणाऱ्या प्रेयसीने आपला अपमान केल्याचा राग आशिषला सहन झाला नाही. त्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून खुनाचे चित्रीकरण, मोबाईलवरील संभाषण आणि सर्व पुरावे सादर केले.

advertisement

पोलीस दलात खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एक दिवस कधी चुकला नाही! गरिब रुग्णांसाठी 15 वर्षांपासून घाटी रुग्णालयात मोफत जेवण, जैन अलर्टचा उपक्रम
सर्व पहा

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या पुराव्यांची दखल घेत तातडीने अटकेचे आदेश दिले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आर्याने गुन्ह्याची कबुली दिली. रामनगर पोलीस ठाण्यात आशिष शेडमाके, आर्या बाल्लावार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध 302 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोटच्या मुलीने केवळ एका खुर्चीसाठी वडिलांचा जीव घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाप मारला अन् खुर्ची मिळवली! अनुकंपा नोकरीसाठी पोटच्या पोरीनेच दिलं मिल्कशेकमधून विष; बॉयफ्रेंडने केला प्रताप उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल