TRENDING:

'मी कोणतीही टक्केवारी खाणार नाही', उमेदवाराचं नाद खुळा शपथपत्र; गावभर चर्चा

Last Updated:

निवडून आल्यानंतर 'हे आम्ही करणार नाही' याची यादी देत आपच्या उमेदवारांचे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर अनोखे शपथपत्र जाहीर केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता कोल्हापुरातील एका उमेदवाराच्या शपथपत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. निवडून आल्यानंतर 'हे आम्ही करणार नाही' याची यादी देत आपच्या उमेदवारांचे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर अनोखे शपथपत्र जाहीर केले आहे. शपथपत्र सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे.
News18
News18
advertisement

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत टक्केवारीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार असं सगळेच पक्ष आपल्या जाहीरनाम्यात सांगत असताना राजर्षी शाहू आघाडी प्रणित आम आदमी पार्टीच्या वतीने थेट हे आम्ही करणार नाही असं पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र जाहीर करण्यात आले. एक दोन नव्हे तर आम आदमीच्या 14 अधिकृत उमेदवारांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प वरती शपथपत्र जाहीर करत शपथ घेतली आहे.

advertisement

उमेदवारांनी स्टॅम्पवर दिलेल्या शपथपत्रात काय नमूद केले?

  • मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही
  • माझा कोणताही अवैध व्यवसाय नाही
  • मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही
  • जनसंपर्कासाठी माझा फोन 24 तास सुरु असेल
  • मी निवडून आल्यानंतर मी ज्या पक्षातून निवडून आलो आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही…
  • advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video
सर्व पहा

मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही, माझा कोणताही अवैध व्यवसाय नाही, मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही अशा पद्धतीने हमी देणारे अनेक विषय असणारे शपथपत्र उमेदवारांनी जाहीर केले.ही निवडणूक फक्त विकास कामांसाठी नाही तर महापालिका राजकारणात वावरत असलेल्या चुकीच्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी असल्याचं आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी सांगितला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मी कोणतीही टक्केवारी खाणार नाही', उमेदवाराचं नाद खुळा शपथपत्र; गावभर चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल