महिला बचत गटांच्या चळवळीत कोल्हापूर आघाडीवर
महाराष्ट्रामध्ये महिला बचत गटांच्या चळवळीत कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील काही बचत गटांची उत्पादने तर राष्ट्रीय स्तरावरही पोहोचली आहेत. एकट्या जिल्हा परिषदेकडेच 27 हजार 758 बचत गट नोंदणीकृत आहेत. या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात.
बचत गटांना व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रोत्साहन
advertisement
दरवर्षी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने भव्य 'ताराराणी महोत्सव' आयोजित केला जातो. या महोत्सवात जिल्ह्यासह राज्यातील अनेक बचत गट सहभागी होतात आणि येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. याशिवाय, सणांच्या निमित्तानेही जिल्हा परिषदेमार्फत बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. आठवड्यातून दोन दिवस तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच 'उमेद' अंतर्गत बचत गटांना व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रोत्साहन मिळते.
मॉलसाठी निकष आणि अटी असणार
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या मॉलसाठी जे निकष आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत, त्या सर्व निकषांची पूर्तता कोल्हापूर जिल्हा परिषद करते. यामुळे, उमेद मॉलसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होण्याची शक्यता खूप जास्त आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरच जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
हे ही वाचा : महिला बचत गटांसाठी मोठी बातमी, १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल, २०० कोटींचा निधी, कॅबिनेटचा निर्णय
हे ही वाचा : Weather Alert: महिनाअखेर बदलली हवा, पश्चिम महाराष्ट्रातून मोठं अपडेट, आजचा हवामान अंदाज