TRENDING:

167 वर्षांपूर्वीचा चर्च, कोल्हापुरातील ख्रिस्ती संस्कृतीचा झाला उदय, तुम्हाला माहितीये का इतिहास?

Last Updated:

Christmas 2024 : कोल्हापुरात ख्रिश्‍चन बांधव सध्या मोठ्या प्रमाणात आहेत. कोल्हापुरात असणाऱ्या या प्रत्येक चर्चला आपलं एक वेगळं महत्त्व आहे. अशाच कोल्हापूर शहरातील सर्वात जुन्या चर्चची माहिती आपण ख्रिसमसच्या निमित्ताने घेणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : कोल्हापुरात ख्रिश्‍चन बांधव सध्या मोठ्या प्रमाणात आहेत. कोल्हापुरात असणाऱ्या या प्रत्येक चर्चला आपलं एक वेगळं महत्त्व आहे. अशाच कोल्हापूर शहरातील सर्वात जुन्या चर्चची माहिती आपण ख्रिसमसच्या निमित्ताने घेणार आहोत. कोल्हापुरातील वाइल्डर मेमोरियल सर्वात जुना चर्च. या चर्चला साधारण 167 वर्ष पूर्ण झाली. इतकच नव्हे तर ह्या चर्चच्या माध्यमातून कोल्हापुरातील ख्रिस्ती संस्कृतीचा उदय झाला असं म्हटलं जातं. लोकल 18 च्या माध्यमातून या चर्चचा रंजक इतिहास आपण या ट्रस्टचे संचालक आनंद म्हाळुंगेकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

advertisement

कोल्हापुरातील वाइल्डर मेमोरियल चर्च 1857 मध्ये हे कोल्हापुरातले पहिले चर्च बांधले गेले. आज या चर्चला साधारण 167 वर्षे झाली. हा चर्च बांधण्यामाग एक रंजक कथा आहे. 1852 मध्ये एक ख्रिश्चन अधिकारी कोल्हापुरात आले त्यांनी छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या पुढे गवताळ जागेमध्ये शेड मारलं होतं. तेथे आपल्या धर्माची ते उपासना करू लागले. याच शेडचे रूपांतर पुढे चर्चमध्ये झालं. ह्या चर्चच नाव पुढे त्यांच्याच नावानं म्हणजेच वाइल्डर मेमोरियल चर्च असं दिलं गेलं. डॉक्टर रॉयल गोल्ड वाइल्डर हे चार डिसेंबर 1852 रोजी कोल्हापुरात धर्मप्रसारासाठी दाखल झाले. कोल्हापुरात ख्रिश्चन हा प्रकार त्याकाळी अस्तित्वात नव्हता. त्यामुळे कोल्हापुरातील ख्रिश्चन संस्कृती ही या चर्चच्या माध्यमातूनच उदयाला आली.

advertisement

वर्षाअखेर फिरायला जायचा बेत करताय? कोल्हापुरातील ही 5 ठिकाणे बेस्ट पर्याय

कोल्हापुरातील पापाच्या दिकटी परिसरातून माळकर तिकडे जाणाऱ्या रस्त्याला उजव्या बाजूला वायलर मेमोरियल चर्च अशी लिहिलेली मोठी इमारत नजरेला पडते. याला जुना चर्च असंही म्हटलं जातं. दर रविवारी इथे उपासना केली जाते आणि छोट्या छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केले जात. अजूनही ही इमारत कोल्हापूरच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी एक आहे.

advertisement

कोण होते डॉक्टर रॉयल गोल्ड वायल्डर?

डॉक्टर रॉयल गोल्ड वाईल्ड हे ब्रिटिश अधिकारी होते. ते 1852 रोजी कोल्हापुरात धर्मप्रसारासाठी आले होते. धर्मप्रसाराच्या कामासाठी आल्यामुळे त्यांना काही काळ कोल्हापुरात विरोध झाला. त्यामुळे त्यांना काही काळ तंबूमध्ये राहायला लागलं त्यानंतर ते मिलिटरी कॅम्पसमध्येही राहिले होते. त्यांचा शिक्षणासाठी ही मोठा हातभार होता. त्याकाळी म्हणजेच 1863 रोजी कोल्हापुरात 32 प्रौढ 19 मुले असा 51 जणांचा ख्रिस्ती समाज होता. त्यानंतर हा समाज पुढे वाढत गेला. कालांतराने 1875 मध्ये डॉक्टर वाइल्डर अमेरिकेला गेले. त्यानंतर कोल्हापुरात दुसरे मोठे चर्च न्यू शाहूपुरी परिसरात बांधले गेले. त्याचं नावही डॉक्टर वाईल्डर यांच्या नावावरच ठेवण्यात आलं. 

advertisement

चर्चच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य 

कालांतराने या चर्चच्या कार्यक्षेत्रात एस्तर पॅटर्न भारतातील फक्त मुलींची दुसरी शाळा उभी राहिली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया जवळच्या जागेतील ही शाळा सुरू झाली. विशेष म्हणजे या शाळेमध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनीही शिक्षण घेतलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजघराण्यामधील अनेक मुली ही या शाळेत शिकत होत्या आजही या परिसरात ही शाळेची इमारत आहे, असं आनंद म्हाळुंगेकर यांनी सांगितलं. 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
167 वर्षांपूर्वीचा चर्च, कोल्हापुरातील ख्रिस्ती संस्कृतीचा झाला उदय, तुम्हाला माहितीये का इतिहास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल