कोल्हापुरातील या गावात शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत अचानक वेळी या विषयावर हा ठराव करण्यात आला. शिरढोण गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शर्मिला टाकवडे होत्या. दरम्यान, दारूबंदी, गावचावडीसमोरील सार्वजनिक स्वच्छतागृह हटवणे, गल्लीतील तुंबलेल्या गटारीवरून ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासन आणि तक्रारदारामध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावमध्ये असणाऱ्या गावचावडीसमोर शासकीय योजनांना मंजुरी घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विषयाला अनुसरून गावातील एका संबंधित व्यक्तीकडून अवैध व्यवसाय तसेच बेकायदेशीर दारू विक्री करण्यात येते ती तातडीने बंद करावी अशी मागणी करण्यात आली. आता अवैध व्यवसाय आणि दारू विक्रीसाठी आम्हाला रीतसर परवानगी देण्यात यावी, असा विषय ग्रामसभेत ग्रामस्थांकडून मांडण्यात आला.
त्यानंतर असा विषय येताच वादावादीला सुरुवात झाली. अखेर सरपंच टाकवडे यांनी या विषयाची दखल घेत, गावात चालू असलेल्या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तक्रारदार शांत झाले. यावेळी उपसरपंच शिवानंद कोरबू, शक्ती पाटील, बाबासो हेरवाडे, आरिफ मुजावर, तेजस्विनी पाटील, ललिता जाधव, रेश्मा चौधरी, मालन कुंभार, अनिता मोरडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.